आपण खाताें अन्नासी। अन्न खाते आपणासीं।।2।।

    09-Nov-2022
Total Views |
 
 

Saint 
 
अशा दुर्दैवी परिस्थितीतही माणसे व्यवहारज्ञान शिकत नाहीत याचे श्रीसमर्थांना दु:ख हाेते. ते म्हणतात, की सुधारण्याऐवजी ताे घरातील वस्तू, एखादी जागा किंवा जनावरे विकून माेठेपणा मिरवताे आणि ताे टिकविण्यासाठी त्याचाच आधार घेऊन पुन्हा कर्ज काढताे. शेवटी हा कर्जाचा खेळ संपत येताे.देणेकरी सावकार त्याला वेढून टाकतात. जाहीररीत्या त्याची अबू्र काढतात आणि जप्तीचीही वेळ आणतात.यातून मार्ग काढण्यासाठी व चार पैसे मिळविण्यासाठी ताे परदेशी जाऊन नाेकरीचाकरी करण्याचा विचार करताे आणि परदेशी प्रयाण करताे.
 
आता श्रीसमर्थ हे साडेतीनशे वर्षांपूर्वी सांगत आहेत आणि गेली 15-20 वर्षे आपण प्रत्यक्षात मिळेल ती नाेकरी पत्करून चार पैसे मिळविण्यासाठी दुबई आणि मस्कतला जाणारी असंख्य माणसे पाहात आहाेत. यावरून श्रीसमर्थांचे द्रष्टेपण सहज कळून येईल. पुढे म्हणतात की दाेन वर्षे त्याने घरदार कुटुंब साेडून परदेशात काढली. पैसे मिळविण्यासाठी पडतील ती हलकी सलकी कामे केली आणि त्यासाठी अफाट शरीरकष्ट भाेगून हाल साेसले. अगदी तंताेतंत आज परदेशी जाणाऱ्या लाेकांना लागू पडणारे हे वर्णन त्या काळात करणे हा श्रीसमर्थांच्या दैवी सामर्थ्याचा, सूक्ष्म अभ्यासाचा आणि द्रष्टेपणाचाच प्रत्यय आहे.यानंतर काय झाले ते पाहण्यापूर्वी क्षणभर थांबून ही परिस्थिती केवळ अंथरूण पाहून पाय न पसरल्यामुळे झाली, हा समर्थ विचार आपण मनाेमनी जाणून आपली वागणूक सुधारणे अतीव गरजेचे आहे! -प्रा.अरुण गाेडबाेले, माे. 9822016299