वाच्यार्थ: पूजाविधी संपन्न झाल्यानंतर आपली दक्षिणा (एक प्रकारचे मानधन) घेऊन पुराेहित यजमानाचे घर साेडताे, गुरूकडून शिक्षा प्राप्त झाल्यानंतर गुरूदक्षिणा देऊन शिष्य गुरूचा आश्रम साेडताे आणि अरण्यामध्ये वस्ती करणारे हरीण दावानलाच्या मुखी वन भस्मसात हाेण्यापूर्वीच तेथून निघून जाते.
भावार्थ : एखाद्या गाेष्टीचा आधार हा केवळ काम पूर्ण हाेईपर्यंतच घ्यावा.
1. विप्र पुराेहित - जाे पूजापाठ करवताे ताे यजमान. जाे ती करताे ताे ब्राह्मण. (विद्वान) अशा ब्राह्मणाला पूजाअर्चा करण्यासाठी एखाद्या घरी बाेलाविले असता, तिथे जाऊन पाैराेहित्य करावे.कार्यसिद्धी झाल्यानंतर मात्र यजमानाला, त्याच्या कुटुंबाला भरघाेस आशीर्वाद देऊन आपले मानधन घेऊन ते घर साेडावे. तेच याेग्य. त्यानंतर तेथे आणखी थांबणे बराेबर नाही.