पत्र सत्ताविसावे
त्याच दिवशी वाचनालयात मी एका आंग्लविद्याविभूषित विद्वानाच्या भाषणास गेले असताना ते विद्वान महाशय म्हणालेआपल्या संस्कृतीत त्यागवाद आहे, तर पाश्चात्त्य संस्कृतीत भाेगवाद आहे. त्यागवाद नेभळट असताे, तर भाेगवाद पराक्रमी असताे. म्हणून आपण मागे पडलाे व पाश्चात्त्य पुढे गेले.अहाे! खरंच का आपली संस्कृती त्या नुसत्या त्यागवादावर आधारलेली आहे? एका वृत्तपत्राने लिहिले हाेते.रघुपती सहाय काेण? त्यांनी काय उत्तर दिले? गरीब माणसाने सारखे गरीब रहावे व त्याने सारखा त्यागच करावा हे म्हणणे बराेबर नाही.तुम्ही गीतेच्या गाभाऱ्यात ह्या विषयावर चांगला प्रकाश टाका.गीता सांगणारा कृष्ण त्यागवादाचा भाे्नता आहे का भाेगवादाचा भाे्नता आहे? तुझा हा प्रश्न नितांत महत्त्वाचा आहे.
सखाेल अभ्यास केला म्हणजे असे दिसते की आपली संस्कृती त्यागवादाची आहे हे म्हणणे बराेबर नसून आपल्या संस्कृतीत त्यागवाद व भाेगवाद ह्यांचा सुंदर समन्वय आहे. गीता सांगणारा कृष्ण आदर्श पुरुष आहे. त्याच्या जीवनाचा एक पाय त्यागवादाचा, दुसरा पाय भाेगवादाचा, एक हात त्यागवादाचा दुसरा हात भाेगवादाचा अशी स्थिती आहे.कृष्णाने उपनिषदरूपी गायीचे दूध काढले व हे दूध म्हणजे गीतामृत. अड्यार येथील ग्रंथसंग्रहालयाने एकशेआठ अधिक एकाहत्तर उपनिषदे छापून प्रसिद्ध केली आहेत. एकशे आठ उपनिषदांवर ब्रह्मयाेगिन पंडितांची टीका आहे व बाकीच्या एकाहत्तर उपनिषदांवर काेणतीच टीका नाही.
तुला माहीत आहे की (1) ईश (2) केन (3) कठ (4) प्रश्न (5) मुंडक (6) मांडु्नय (7) तैत्तिरीय (8) ऐतरेय (9) छांदाेग्य व (10) बृहदारण्यक. ही दहा उपनिषदे मुख्य उपनिषदे आहेत.एक महामंत्र आहे.त्य्नतेन भुंजीथा:। त्यागाने भाेग घ्यावा.हाच महामंत्र आपल्या उपनिषदाचा व गीतेचा गाभा आहे. ह्या महामंत्रावरून तुला कळून येईल कीत्यागवाद व भाेगवाद ह्यांचा सुंदर समन्वय हेच जीवनाचे खरे सूत्र आहे.त्यागाचे लिंबू व भाेगाची साखर यापासून बनवलेले सरबत म्हणजे आपली संस्कृती, म्हणजे गीतेची शिकवण, म्हणजे कृष्णाचे जीवन.कार्लाईल म्हणताे की गुणांचा अतिरेक झाला म्हणजे दुर्गुण हाेताे व गुणांच्या अतिरेकांचा सुवर्णमध्य म्हणजे सद्गुण.कृष्ण तुला सांगेल की- भाेगवाद अथवा त्यागवाद ह्यांचा अतिरेक झाला म्हणजे दुर्गुण हाेताे व भाेगवाद आणि त्यागवाद ह्यांचा सुंदर समन्वय झाला म्हणजे सद्गुण हाेताे.