तरुणसागरजी

    09-Nov-2022
Total Views |
 
 
 

Tarunsgarji 
 
पाेलीस शिपायाने चाेराला पकडले खरे; पण बेड्या आणायचा विसरूनच गेला. शिपाई म्हणाला, ‘‘अरे! मी बेड्या आणायच विसरलाे.’’ त्यावर चाेर म्हणाला, ‘‘काही टेन्शन घेऊ नका. मी आता बेड्या घेऊन येताे.’’ त्यावर शिपाई म्हणताे कसा, ‘‘अरे व्वा ! तू मला मूर्ख समजताेस काय ? तू इथेच थांब. मी घेऊन येताे बेड्या!’’ आता तुम्हीच सांगा काेण मूर्ख ठरला. शिपाई की चाेर ? कधी कधी मनुष्य स्वत:ला खूपच शहाणा समजताे. पण, त्याच्याकडील शहाणपण मात्र कुठेच दिसून येत नाही.