चाणक्यनीती

    08-Nov-2022
Total Views |
 
 

chanakya 
4. अनाहूत पाहुणा : आपल्या घरी आलेल्या अभ्यागतांचे स्वागत करण्याची आपली परंपरा आहे. ‘अतिथी देवाे भव:’ असे शिकविणारी आपली संस्कृती आहे. त्यामुळे अचानकपणे आलेल्या पाहुण्याचेही घरामध्ये चांगले आदरातिथ्य हाेते; पण पाहुणचार घेऊन ताे आला तसा ते घर साेडून निघूनही जाताे.
 
बाेध : माणसे, पशुपक्षी केवळ स्वार्थापाेटी आश्रयस्थान शाेधतात. स्वार्थ संपला की, लगेच त्या स्थानाचा त्याग करतात. अनीस लखनवी या शायरने म्हटले आहे, ‘‘यह दुनिया भी एक अजब सराय ानी देखी, हर एक चीज जहां की आनीजानी देखी...’’ म्हणून काेणाला जास्त जीव लावू नये.आपला जीव त्यांच्यात गुंतला तर अपमान आणि वियाेगाचे दु:खच पदरी पडते.