गीतेच्या गाभाऱ्यात

    08-Nov-2022
Total Views |
 
 
पत्र सत्ताविसावे
 

bhagvatgita 
 
तू एक गाेष्ट मात्र लक्षात ठेव की, जाे माेठा असताे ताे चांगला असताेच असे नाही. जाे माेठा आहे पण चांगला नाही अशा माणसाचे चरित्र वाचण्यात आपले आयुष्य उदात्त व उन्नत बनत नाही.कृष्णाने चांगल्या माणसाला किंमत दिली आहे. जाे चांगला आहे आणि जाे माेठा आहे त्याचे चरित्र तू वाचत जा. असे चरित्र वाचण्याने आपला फार माेठा फायदा हाेताे.काही लाेक म्हणतात कीइतिहास वाचावा, चरित्र वाचू नये.हे म्हणणे बराेबर नाही. इतिहास वाचावा, आणि चरित्रदेखील वाचावे हे म्हणणे ठीक आहे; पण चरित्र वाचू नये, इतिहास वाचावा हे म्हणणे बराेबर नाही. डिझरायलीने म्हटले आहे की- ‘इतिहास वाचू नका. चरित्राशिवाय काहीच वाचू नका. कारण चरित्र म्हणजे सिद्धांताच्या चाैकटीत न झालेले जीवन आहे.’
 
तू आपल्या पत्रात लिहितेस - परवा मी एका विद्वानाचा लेख वाचला. त्याने म्हटले आहे की गीतेने ज्ञानाला किंमत दिली आहे. ज्ञानाने माेक्ष मिळताे. गीता वाचून आपण कर्माला अथवा भ्नतीला अजिबात किंमत देऊ नये. फ्नत ज्ञानाला किंमत द्यावी, जेथे कर्म अथवा जेथे भ्नती तेथे गीतेचा निवास असताे असे लक्षात ठेवावे व कर्माला अथवा भ्नतीला किंमत न देता फ्नत ज्ञानाला किंमत द्यावी - हे मत बराेबर आहे का? तुम्हाला काय वाटते? गीतेचा निवास काेठे असताे त्याबद्दल एखादे सुंदर वा्नय सांगा म्हणजे ते मी माझ्या डायरीत टिपून ठेवते -’ त्या विद्वानाने जे म्हटले ते बराेबर नाही. गीतेमध्ये ज्ञान, कर्म व भ्नती ह्यांचा सुंदर समन्वय केला आहे. ज्ञानावर जास्तीत जास्त जाेर देणारे शंकराचार्य- माेक्षकारणसामग्ऱ्या भ्नितरेव गरीयसी।। असे म्हणून माेक्ष मिळवण्याकरता जास्तीत जास्त जाेर भ्नतीवर देतात.
 
कर्मावर जास्तीत जास्त जाेर देणारे लाेकमान्य टिळक म्हणतात की ज्ञानमूलक भ्नितप्रधान कर्मयाेग हे गीतेचे रहस्य आहे. याचा अर्थ असा की गीतेमध्ये ज्ञान, कर्म व भ्नती ह्यांचा समन्वय आहे व त्यामध्ये भ्नती प्रधान आहे.तू गीतेच्या अनुषंगाने हल्ली खूप वाचतेस. तू मनाशी प्नकी खूणगाठ बांध की कृष्णाने गीतेमध्ये ज्ञान, कर्म व भ्नती ह्यांचा सर्वाेत्कृष्ट सुंदर समन्वय केला आहे.तुझ्या डायरीत टिपून ठेवण्याकरता गीतेचा निवास काेठे आहे ह्याबद्दल तुला एक सुंदर वा्नय पाहिजे आहे. थाेडासा विचार केल्यावर मला जे वा्नय सुचले ते असेज्ञानाचा श्वास, कर्माचा नि:श्वास, आणि भ्नतीचा विश्वास, तेथ गीतेचा निवास.तू आपल्या पत्रात लिहितेस - एकदा मी देवळात प्रवचनाला गेले हाेते. एक नामांकित शास्त्री सांगत हाेते- ‘आपली संस्कृती त्यागवादाची आहे, तर पाश्चात्त्यांची संस्कृती भाेगवादाची आहे.’