वाच्यार्थ: गणिका (वैश्या) निर्धन पुरुषाला, प्रजा पराजित हतबल राजाला, पक्षी फळे नसलेल्या वृक्षाला आणि अचानक आलेला पाहुणा भाेजनादी पाहुणचारानंतर निराेप घेताे.
भावार्थ : 1. वेश्या : वेश्या ही चैनीसाठी, तर कधी-कधी आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी नाईलाजास्तव शरीरविक्रय करते. तिचा व्यवहार धनासाठीच असताे. त्यामुळे धनिक व्यक्ती धनहीन झाल्यास ती स्वाभाविकच त्याला साेडून देते. तिच्या दृष्टीने ती व्यक्ती एक ग्राहक असते. तिचा त्या व्यक्तीशी कुठलाही भावनिक संबंध नसताे.