चाणक्यनीती

    04-Nov-2022
Total Views |
 
 
 

chanakya 
 
 
5. शूद्र - शूद्रांना सर्वांची सेवा करावी लागते.जाे जास्त सेवाभावी त्याचा मान माेठा असताे. उदा.नर्सिंग  या क्षेत्रात स्त्रिया जास्त असतात; कारण मुळातच त्या मातृहृदयी, सेवाभावी, त्यागी असतात. त्यामानाने पुरुष कमी असतात. त्यातून जाे/जी रुग्णांची चांगली शुश्रूषा करताे/करते, त्याला/तिला जास्त (मागणी) मान मिळताे.
 
बाेध : श्रमविभागणी आवश्यक आहे. ार पूर्वी ही वर्णव्यवस्था जन्मावर नव्हे, तर कर्मावर अवलंबून हाेती. मध्यंतरीच्या काळात ती जन्माधिष्ठित बनली, विकृत बनली; परंतु आज पुन्हा ती कर्माधिष्ठितच आहे. आज विद्वान=शिक्षक, क्षत्रीय=सैनिक, वैश्य=व्यापारी, शुद्र=सेवाभावी, नर्सिंग आदी क्षेत्रातले व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार सन्मानही प्राप्त करते. थाेडक्यात प्रत्येकाचे कर्म हाच त्याचा धर्म, त्याचे कर्तव्य.जाे आपले कर्म मनापासून करताे त्याला निश्चितच ‘बळ’, प्रतिष्ठा प्राप्त हाेते.