म्हणूनि अग्निसेवा न सांडितां। कर्माची रेखा नाेलांडितां । आहे याेगसुख स्वभावता । आपणपांचि।। 6.51

    03-Nov-2022
Total Views |
 
 

Dyaneshwari 
 
स्वभावत:च आत्मसुख देणारा कर्मयाेग कसा आहे हे सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात की, अग्निहाेत्रादि नित्यकर्मे न साेडता, आचारधर्माची मर्यादा न ओलांडता या कर्मयाेगाचे आचरण करावयास हवे. याेगी आणि संन्यासी हे दाेन्ही एकच असल्याचे ज्ञानेश्वरांनी पूर्वी स्पष्ट केले आहे.एखाद्या पुरुषास आपण भिन्न भिन्न नावांनी संबाेधिताे किंवा एखाद्या स्थळास जाण्याचे मार्गही भिन्न असतात. निरनिराळ्या आकारांच्या भांड्यांत भरलेले उदक एकच असते. त्याप्रमाणे याेग आणि संन्यास वरवर भिन्न वाटले तरी एकच हाेत. म्हणून अर्जुना, कर्माचे आचरण करूनही जे फलाची अपेक्षा करीत नाहीत, ते याेगी समजावेत.पृथ्वी वृक्षादिकांची निर्मिती करते. पण त्यांच्या फलाची अपेक्षा धरत नाही. त्याप्रमाणे कर्मयाेगी पुरुष परब्रह्माच्या व्यापकतेचा आश्रय घेताे.
 
आपल्या स्वभावास अनुसरून उचित कर्मे करीत असताे. पण त्यावेळेस त्याला देहबुद्धीचा वा कर्माचा अहंकार नसताे. फलाची इच्छा त्याच्या मनातही निर्माण हाेत नाही. असा हा पुरुष खरा संन्यासी व खरा श्रेष्ठ याेगी हाेय. परंतु हे न साधल्यामुळे जाे स्वाभाविक कर्मे बंधनकारक समजून साेडताे, त्याच्यामागे दुसरीच कर्मे लागतात. अंगाला लावलेला एक लेप पुसून टाकावा आणि एक नवाच लेप पुन्हा लावावा त्याप्रमाणे त्याची अवस्था हाेते.खरे पहाता गृहस्थधर्माचा भार हा स्वभावत:च आपल्या शिरावर असताे. ताे नीट सांभाळण्याऐवजी नवेच संन्यासाचे ओझे घेऊन काय ायदा? सारांश, नित्यकर्मे अवश्य करावीत. आचारधर्म न साेडावा.म्हणजे कर्मयाेग सदासुखदायक हाेताे.