वाच्यार्थ:राजा आपल्या सेवेत नेहमी सुसंस्कारी लाेकांना वेगवेगळ्या पदांवर नियु्नत करताे. याचे कारण असे की, चांगल्या संस्कारांच्या सदाचारी व्य्नती राजाची साथ कधीच साेडत नाहीत.
भावार्थ : राजा नेहमी सुसंस्कारी लाेकांसाेबत राहताे.
1. कुलीन - येथे कुलीनचा अर्थ आहे चांगल्या, संस्कारी कुळातला. अशा व्य्नती तत्त्व जपतात, ते नीतिमान असतात. अशी व्य्नती प्रामाणिक, विश्वासू व निष्ठावान सेवक असतात. ‘प्राण जाये पर वचन न जाय’ म्हणत राजासाठी त्यांच्या आदेशांचे पालन करण्यासाठी प्राणपणाला लावतात.ते राजाला आयुष्यात सुरुवातीपासून शेवटपर्यर्ंत साथ देतात.