ओशाे - गीता-दर्शन

    29-Nov-2022
Total Views |
 
 

Osho 
 
आम्हा प्रत्येकाला त्यांनी जवळ बाेलावले अन् कानात काहीतरी सांगितले. मलाही त्यांनी बाेलावले आणि कानांत सांगितले - ‘आत्ता तुला जास्त समजायचं नाही, पण तू आता समजशील तेवढं अवश्य सांगताे.लक्षात ठेव, एवढी एक गाेष्ट तुला समजली, तर आयुष्यभर आणखी काहीही समजून घ्यायची तुला गरज पडणार नाही. अगदी छाेटीशी गाेष्ट आहे, अन् तुला ती न्नकीच समजेल. ती मी तुला सांगून टाकताे. मरत असलेल्या वडिलांनी सांगितलेली ही छाेटीशी गाेष्ट आहे, नीट लक्षात ठेव आणि ती मानून घे.. तुला द्यायला माझ्याजवळ दुसरं काहीही नाही-’’ यावर त्या छाेट्या गुर्जिएफने म्हटले, ‘मला सांगा मी ती अवश्य करीन.’ वडिलांनी म्हटले, ‘मी तुला काही फारसं अवघड काम देणार नाही. तुझं वयच आत्ता कितीसं आहे! मी तुला एवढंच सांगताे की जेव्हा तुला असं वाटेल की, ज्यामुळे तुला वा इतरांना दुःख हाेणार असेल असं काम करावं तेव्हा तू चाेवीस तास थांबावंस आणि मग करायचं ते करावंस.
 
’ गुर्जिएफने विचारले, ‘चाेवीस तासांनंतर तर करायला काही हरकत नाही ना?’ यावर वडिलांनी म्हटले, - ‘निःशंक संपूर्ण श्नतीनुसार ते निःसंकाेचपणे करून टाकायचं.’ आणि हसत हसत त्यांनी प्राण साेडला.गुर्जिएफ आपल्या संस्मरणात लिहिताे, ‘मी माझ्या आयुष्यभरात काेणतेही वाईट काम करू शकलाे नाही. माझ्या वडिलांनी मला झकासपैकी फसविले. चाेवीस तासांनंतर काय करायचं ते करावं, एवढंच त्यांचं म्हणणं हाेतं.’ पण चाेवीस तास हा तर खूप माेठा अवधी आहे. वाईट काम करताना चाेवीस सेकंद जरी कुणी थांबला, तरी त्याला ते वाईट काम पुरे करणे श्नय हाेणार नाही. चाेवीस सेकंदही पुरे आहेत.