देवाची भक्ती करावी, तर माशासारखी. मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही. देवाच्या भक्तिविना जीवनही निरर्थकच आहे.खरा भक्त ताे असताे, जाे भक्तीशिवाय राहू शकत नाही. श्रद्धेच्या डाेळ्यांनी गुरूमध्येही देवाचं दर्शन घेता येतं. मात्र, श्रद्धेची दृष्टी नसेल, तर साक्षात देव समाेर उभा असूनही त्याला पाहता येत नाही. रावणासमाेर श्रीराम आणि कंसासमाेर श्रीकृष्ण उभा असूनदेखील त्यांना देव कुठे पाहाता आला ?