जाे श्रुतिगाैरवाच्या मांडवीं । काम सृष्टीचा वेलु वाढवी। जंव कर्मफळेंसि पालवी । अपवर्गीं टेंके।। 7.50

    28-Nov-2022
Total Views |
 
 

dyaneshwari 
प्रकट झालेले जग आणि आत्मतत्त्व यांचा संबंध मागच्या ओवीत ज्ञानेश्वरांनी स्पष्ट केला आहे. आता हाच विचार ते आणखी काही दृष्टांत देऊन स्पष्ट करीत आहेत. गीतेच्या आधाराने ते म्हणतात की, पाण्याच्या ठिकाणचा रस मीच आहे.वायूच्या ठिकाणी असलेला स्पर्श आणि चंद्राचा प्रकाश मीच आहे. पृथ्वीच्या ठिकाणचा गंध मीच आहे.आकाशातील शब्द मीच व वेदांतील प्रणव म्हणजे माझेच स्ुरण आहे. अग्नीचे तेज मीच आहे. जीव पृथ्वीवर वेगवेगळे दिसले तरी त्यांच्यातील आत्मतत्त्व एकच आहे. हे अनादी तत्त्व आकाशरुपी अंकुराने वाढते आणि प्रलयाच्या काळी अ, उ, म, ही अक्षरे गिळून सर्व सृष्टीचा लय करते. असे हे अनादी तत्त्व म्हणजे विश्वाचे बीज मीच आहे. हा विचार मी आणखी थाेडा स्पष्ट करताे. तपस्व्यांचे तप हे माझेच रूप आहे. बलवंतांमध्ये बल मीच आहे. बुद्धिवानांच्या ठिकाणची गती मीच आहे.
 
विषयवासना पूर्ण करण्यासाठी धनाचे संपादन केले जाते. आणि ही वासना म्हणजे मीच आहे. त्यांना आपण विकार म्हणून शत्रू मानताे त्यांचे नेमके स्वरूप ज्ञानेश्वर या ठिकाणी व्यक्त करताना दिसतात. विकार वाढला की, आपण इंद्रियांना आवडेल असे जरी वागलाे तरी हा विकार धर्माच्या विरुद्ध कधी असू नये. शास्त्राने निषेध केलेल्या आडमार्गास साेडून देऊन नियमांची मशाल घेऊन पुढे जावे.अशा रीतीने विषयवासनेची पूर्ती शास्त्रीय मार्गाने हाेत असेल तर ते धर्माचेच आचरण हाेय. अशी ग्वाही ज्ञानेश्वर देतात. असा विषय भाेगणारे पुरुष माेक्षतीर्थावरील माेतीच हाेत. वेदांच्या आज्ञेचा अत्यंत आदर करून या आदररूपी मांडवावर आपल्या विषयवासनेची वेल पसरवावी. तिची पाने, ुले मग माेक्षरूपी ध्येयापर्यंत पाेहाेचली आहेत असे ध्यानात येईल. ज्ञानेश्वरादि संत विषयवासनेच्या विरुद्ध कसे व किती आहेत हे या ओवीवरून ध्यानात येईल.