ओशाे - गीता-दर्शन

    28-Nov-2022
Total Views |
 
 

Osho 
 
जर आपणाला असं दिसलं की दु:ख मिळेल आणि तरी आपण ते काम करायला तयार असाल, तर आपण असं समजा की आपण आपला तिरस्कार करत आहात. याशिवाय दुसरी कसाेटी असू शकते काय? समजा ताेंडात शिवी, अपशब्द अगदी तयार आहेत, पंख फडफडून तयार आहात उडून जाण्यासाठी, बस्स फ्नत आवाजाच्या रूपाने सरबत्ती चालू व्हायचाच अवकाश. या क्षणी विचार करा की या बाेलण्याने आपणास सुख मिळेल का दु:ख? याबाबत समाेरच्याचा विचार नका करू. कारण दुसऱ्याबाबत विचार करण्यातच फसवणूक हाेऊन जाते.माणूस असा विचार करताे की, समाेरच्याला सुख मिळेल वा दु:ख? हा विचार नका करू.आधी स्वत:चाच विचार करा की यानं मला दु:ख मिळेल वा सुख? जर उत्तर आलं, ‘दु:ख मिळणार’ आणि तरी आपण अपशब्दउच्चारून टाकला, तर आपण आपल्यावर प्रेम करता असं म्हणायला काही जागा आहे काय? नाही.
 
आपण स्वत:ला असा विचार करायची संधीच देत नसताे. तशी संधी दिली तर मग अशी भीती आहे की, मग आपण शिवी देऊ शकणार नाही. गुर्जिएफ माेठा अजब फकीर हाेऊन गेला.त्याच्या स्मरण-पुस्तकात त्याने लिहून ठेवलं, ‘माझे वडील वारले, त्यावेळी मला देण्यासाठी त्यांच्याजवळ काही नव्हते, पण तरीही त्यांनी मला इतकी संपदा देऊन ठेवली की तिची गणतीच करता येणार नाही.’ जेव्हा ताे कुणाला असे सांगे तेव्हा ऐकणाऱ्याला माेठे आश्चर्य वाटे. ताे उलट विचारी, ‘जर तुझ्या वडिलांकडे काही नव्हते म्हणताेस, तर मग त्यांनी कसली संपदा दिली म्हणताेस?’ गुर्जिएफ सांगे, ‘‘जेव्हा माझे वडील वारले तेव्हा मी नऊ -दहा वर्षांचा असेन, अन् सगळ्यात लहानही.