वाच्यार्थ: दुष्ट व्य्नती आणि साप यांच्यापैकी एकाची निवड करायची झाली, तर दुष्ट व्य्नतींपेक्षा सापाला निवडावे; कारण साप फ्नत विशिष्ट वेळीच दंश करताे; परंतु दुर्जन मात्र पदाेपदी डंख (वागण्या-बाेलण्याने) मारताे.
भावार्थ : येथे चाण्नयांनी दुष्ट व्य्नती आणि सापाची तुलना करून त्यांच्यातील फरक सांगितला आहे.
1. दुष्ट व्य्नती - दुष्ट स्वभावाची व्य्नती इतरांना नेहमीच त्रास देते. इतरांना त्रास झाला की, त्या दुष्ट व्नतीला आनंद हाेताे. अशी विकृत स्वभावाची व्य्नती कुणालाही आवडणार नाही. साैम्य, चांगल्या स्वभावाची, मृदू वाणीची व्य्नती सगळ्यांनाच आवडते. विनाकारण सर्वांना कटू बाेलणारी व्य्नती काेणालाच आवडत नाही.