गीतेच्या गाभाऱ्यात

    26-Nov-2022
Total Views |

bhagvatgita
पत्र अठ्ठाविसावे मंगळवेढ्याच्या तहसील कचेरीत कृष्णाजी मुजुमदार या नावाचा एक गृहस्थ हाेता. आपण तहसीलदार व्हावे अशी त्याला महत्त्वाकांक्षा हाेती. त्याने वरील प्रकारानंतर बिदरच्या बादशहाकडे चुगली केली.हुमायुनशा जात्याच क्रूर. परवानगीशिवाय दामाजीपंतांनी सरकारी पेवातले धान्य लाेकांना दिले, यामुळे ताे क्रुद्ध झाला.त्याने ताबडताेब हुकूम काढला कीकृष्णाजी मुजुमदार यांना मंगळवेढ्यास तहसीलदार नेमले आहे व दामाजीपंतांना पकडून बिदरास आणावे.बिदरहून पठाण मंगळवेढ्यास आले. हुकमाप्रमाणे कृष्णाजी मुजुमदार तहसीलदार झाला. त्याचे गंगेत घाेडे न्हाले.त्या पठाणांनी दामाजीपंतांच्या मुस्नया बांधल्या व त्याला घाेड्यावर बसवून ते यमदूत निघाले.ते दृश्य पाहून सावित्रीबाईंनी हंबरडा फाेडला. मंगळवेढ्याची सारी जनता जमा झाली. दामाजीपंतांच्या मुस्नया बांधलेल्या पाहून जमलेले सारे लाेक.
 
आमचा दाता। आमचा दाता। म्हणून ओ्नसाबाे्नशी रडू लागले.मुस्नया बांधलेल्या दामाजीपंतांची मिरवणूक पंढरपूरच्या वाटेने निघाली. लाेक टाहाे फाेडून रडत आहेत. त्यांना भ्नितभावनेने नमस्कार करत आहेत.ताे देखावा पाहून पठाणांची मने देखील हेलावून गेली.आत्तापर्यंत हुमायुनशाच्या कारकीर्दीत त्यांनी पुष्कळ लाेकांना मुस्नया बांधून नेले हाेते, पण आजचा प्रकार काही वेगळाच हाेता.
पत्थराला पाझर फाेडणारे लाेकांचे ते अनावर दु:ख पाहून पठाणांचे डाेळे देखील पाणावले.संत नामदेव महाराजांनी चाेखामेळ्याच्या अस्थी नेताना ज्या ठिकाणी विसावा घेतला हाेता, व ज्या ठिकाणी पादुका स्थापन केल्या हाेत्या, त्या विसाव्याच्या ठिकाणी विसावा घेण्यासाठी सर्व मंडळी थांबली.
 
त्या पठाणाचा मुख्य हबिबुल्लाखान हाेता. त्याला दामाजीपंतांनी विचारले- ‘तुम्ही काेठे राहता?’ हबिबुल्लाखान ‘बिदरला शहागंज वेशीजवळ आमचा माेठा वाडा आहे.’ दामाजीपंत -‘नसरुद्दीनखान तुम्हाला माहीत आहेत?’ हबिबुल्लाखान -‘ते माझे वडील. दाेन वर्षांपूर्वीच ते पैगंबरवासी झाले.’ दामाजीपंत -‘1448 च्या गुजरातच्या लढाईत त्यांचा हात माेडला म्हणून?’ दामाजीपंत -‘अहाे! ते नि मी एकाच ठिकाणी लढत हाेताे.त्यांचा हात माेडल्यावर मीच त्यांना शत्रुपासून साेडवलं व तुमच्या घरी पाेचतं केलं.’ हबिबुल्लाखान- ‘ताे महान ब्राह्मण सरदार म्हणजे तुम्ही! त्यावेळी मी 15-16 पंधरा साेळा वर्षांचा हाेताे. तुमचे उपकार स्मरून माझ्या आईने तुम्हाला कंठा बक्षीस दिला.
 
पण ताे न घेता तुम्ही ‘मासाहेब’ म्हणून माझ्या आईला नमस्कार केला व काहीही न घेता तुम्ही गेला. काय मी पातकी आहे! माझ्या पित्याला जीवदान देणाऱ्याच्या मी मुस्नया बांधाव्या! ध्निकार असाे माझा!! एवढे बाेलून डाेळ्यांत पाणी आणून हबिबुल्लाखानदामाजीपंतांच्या पाया पडला. त्यानं त्यांच्या मुस्नया साेडल्या व सर्वच मामला बदलला.दामाजीपंतांना पकडून बिदरला नेत आहेत ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली हाेती. ज्या संताने स्वत:चा काहीही स्वार्थ न साधता असंख्य लाेकांचे प्राण वाचवले व ज्याने पंढरीचे रक्षण केले त्या संताला पकडून गुन्हेगार म्हणून बिदरला नेत आहेत व तेथे त्याला फाशी दिले जाणार, या प्रकारामुळे पंढरपूरची सारी जनता स्फुंदून स्फुंदून रडू लागली.