थाेडें परि निरें । अविट तें घ्यावें खरें ।।2।।

    25-Nov-2022
Total Views |
 
 

saint 
 
संसारात अडकलेल्या जीवांना इतरांकडून नाशवंत आणि भाैतिकच घेण्यात आनंद वाटताे.नाशवंत आणि भाैतिक वस्तूतच सुख मानणाऱ्या या जीवाला अविट आणि यथार्थ कांही तरी आहे,याचा परिचयच हाेत नाही. कारण त्याची मानसिकता भाैतिक सुखाच्या पलीकडे झेपावत नाही. मीमध्ये अडकलेल्या जीवाकडून नाशवंत व भाैतिक सुखाच्या पलीकडे विचार करण्याची अपेक्षाही व्यर्थच ठरते.ज्या जीवाला मीमुळे आपला नाश हाेत आहे, याचा विश्वास पटताे आणि म्हणून असा जीव मीतून बाहेर पडण्यासाठी धडपडत असताे, ताेच जीव अविट आणि यथार्थतेचा विचार करू शकताे. देणारा एक असेल तर घेणारे शेकडाे असतात.
 
घेणाऱ्याकडून काय आणि किती घ्यायचे याची मर्यादा घेणारे लाेक केव्हांच ओलांडून जातात. अन्नदान, वस्तूदान, वस्त्रदान काहीही असाे, बऱ्याचवेळा देणाऱ्याला पळ काढायची वेळ येते. कारण घेणाऱ्यांची मनाेवृत्ती कितीही घेऊनही स्थिर झालेली नसते. खरे म्हणजे नाशवंत व भाैतिक वस्तूच्या देण्याने देणाराही समाधानी हाेत नाही आणि घेणाराही समाधानी हाेत नाही. आपण ज्ञानाेबा-तुकाेबांचे भक्त असल्याने अशा असमाधान देणाऱ्या देवाण-घेवाणीकडे न वळता याेग्य आणि यथार्थतेच्या देवाण-घेवाणीकडे वळू या. जय जय राम कृष्ण हरी - डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448