पत्र अठ्ठाविसावे
एकदा एक मनुष्य पानावर बसला. एक घास घेतल्याबराेबर ओ्नसाबाे्नशी रडू लागला त्याचे ते रडणे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. मग ताे म्हणालाकाय करू? घास घशाखाली उतरत नाही. मी येथे जेवताे आहे. पण घरी बायका माणसे तीन चार दिवसांची उपाशी आहेत.दामाजीपंत म्हणाले- ‘काळजी करू नका. जाताना तुमच्याबराेबर धान्य देताे.त्या महान दुष्काळात दामाजीपंत गाेरगरीबांचे वाली हाेते.शेवटी दामाजीपंतांच्या घरचे धान्य देखील संपले. त्यावेळी त्यांच्या पत्नीने आपल्या अंगावरचे सारे दागिने विकून धान्य आणले व गाेरगरीबांना दिले.मंगळवेढ्यास सरकारी दाेन पेवे हाेती. त्यांना ‘गंगाजमना’ असे म्हणत असत. प्रत्येक पेवात सहाशे खंडी धान्य हाेते.दामाजीपंतांना लाेकांचे हाल पाहवेनात. त्यांनी बिदरला कळविले की लाेकांना पेवातील धान्य देण्याची परवानगी द्यावी. निदान ते धान्य विकण्याची परवानगी द्यावी.
दामाजीपंतांनी सांडणीस्वार पाठवले, पण बादशहा हुमायुनशा चैनीत मग्न, स्वत:च्या चैनीपुढे त्याला कशाचीही पर्वा नव्हती.दामाजीपंतांनी पुष्कळ वाट पाहिली पण उत्तर नाही.हजाराे लाेक दामाजीपंतांच्या वाड्याभाेवती जमा झाले हाेते. भुकेने ते तडफडत हाेते. दामाजीपंतांना ते दृश्य पाहवत नव्हते. ते सारखे देवाजवळ विनवणी करत हाेते की.बिदरहून परवानगी येऊ द्या.पण परवानगी आली नाही.सावित्रीबाई म्हणाल्यानाथ, मला यांचे हाल पाहवत नाहीत.’ दामाजीपंत म्हणाले- ‘अजून परवानगी आली नाही. येण्याचे चिन्ह दिसत नाही, मला वाटतेपरवानगी आली नाही तरी आपण पेवे खाेलून लाेकांना धान्य द्यावे.’ सावित्रीबाई म्हणाल्या- ‘तसंच करा. हजाराे लाेकांचे प्राण वाचतील.’ दामाजीपंत म्हणाले.‘बादशहा फार क्रूर आहे ताे मला फासावर देईल. मला वाटते हजाराे लाेक जगत असतील, तर त्यांच्यासाठी आपण प्राण द्यावा.’ सावित्रीबाई म्हणाल्या.
‘नाथ, तुमच्याबराेबर मी देखील फासावर जायला तयार आहे!’ हे पहा, तुझ्या डाेळ्यात एकदम पाणी येईल, अग! संतांचे जीवन वाचत असताना डाेळ्यास जे अश्रू येतात ना त्यांनीच आपले जीवन पावन हाेतं.दामाजीपंतांनी देवाला मनाेभावे नमस्कार केला. त्यांनी मग रक्षकांना काेठाराची कुलपे काढण्यास सांगितले व अन्नाविना मरणाऱ्या लाेकांना पेवातील धान्य नेण्यास सांगितले. पंढरपूरचे व आसपासचे असंख्य लाेक मृत्यूच्या तडाख्यातून वाचले. गंगाजमना ही सरकारी पेवे लुटण्याचे काम आठ दिवस चालले हाेते. भुकेने तडफडणारे व मृत्यूच्या दारातून वाचलेले लाेक म्हणू लागले.‘दामाजीपंत म्हणजे साक्षात पंढरीचा विठाेबा’ संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.पंढरीचं रक्षण दामाजीपंतांनी केलं.दामाजीपंतांनी असंख्य लाेकांचे प्राण वाचवले व लाेकांना ते देवाप्रमाणे वाटू लागले, हे खरे असले तरीसंतांचे हाल हाल हा जगाचा नियम आहे. हे हाल हाल ज्याला पचवता आले, त्यालाच अमृताचा कलश मिळताे.