धर्माधर्मांमध्ये आंतरिक प्रवाह बरेच असतात, पण धर्माच्या इत्नया भिंती उभारल्या आहेत की या आंतर्प्रवाहांचे काहीच स्मरण आपणास त्या भिंतीमुळे राहत नाही. नाहीतर प्रत्येक मंदिर आणि मशिदीच्या तळघरातून बाेगदे निघायला पहिजे हाेते, अशासाठी की त्यातून कुणालाही मंदिरातून मशिदीकडे जाता यावे. प्रत्येक गुरुद्वाराखालून असे मंदिराला जाेडले जाणारे बाेगदे निघायला पाहिजे हाेते म्हणजे केव्हाही काेणालाही वाटेल तेव्हा ताे तत्काळ गुरुद्वारामधून मंदिराकडे वा मशीदीकडे वा चर्चकडे जाऊ शकला असता. बाेगदे तर लांब राहिले, वरचेसुद्धा सगळे रस्ते बंद आहेत. सगळेच्या सगळे रस्ते बिलकुल बंद आहेत.जाे कुणी आपला स्वत:चा मित्र हाेऊन जाताे ताे इतरांबराेबर असाच वागेल, जसे दुसऱ्याने त्याच्याबराेबर वागावे अशी त्याची इच्छा आहे.
जाे स्वत:चा शत्रू आहे ताे इतरांबराेबर असाच वागेल, जसे इतरांनी त्याच्याबराेबर कधीच वागू नये, ताे याेगाच्या यात्रेला निघालाच म्हणून समजा आणि आत्मा आपला मित्रही हाेऊ शकताे वा शत्रूही हाेऊ शकताे.लक्षात ठेवा की शत्रू हाेणे फार साेपे आहे, शत्रू हाेण्यासाठी काय करावे लागते याचा आपण कधी विचार केला आहे काय? जर आपल्याला काेणाचे शत्रू व्हायचे असेल तर आपण एका क्षणात हाेऊ शकताे आणि जर मित्र व्हायचे असेल तर संपूर्ण आयुष्यसुद्धा अपुरे आहे. आपल्याला जर काेणाचे शत्रु व्हायचे असेल तर क्षणांची देखील काहीही गरज नाही, क्षणभर पुरेसा आहे. तर बाेचरा शब्द शत्रुत्वाची पूर्ण व्यवस्था करताे. पण काेणाचे मित्र व्हायचे असेल तर सगळं आयुष्यसुद्धा पुरेसे नाहीये. जीवनभर श्रम करूनही जखमा कायम राहतातच, त्या भरून निघतच नाहीत.