श्राेत्यांच्या मनावर आपला उपदेश नीट ठसावा म्हणून अनेकदा संतांना ताे पुन्हापुन्हा सांगावा लागताे. शिवाय श्राेत्यांचेही अनेक वर्ग असतात. काही श्राेत्यांना भावार्थ पटकन समजताे. काहींना थाेड्या वेळाने समजताे. तर काही श्राेत्यांना व्नत्यानेच तात्पर्य काढून स्पष्टपणे ताे सांगितल्याशिवाय उमगत नाही. शाळेमध्ये चांगले गुरुजी शिकविताना सर्वांत ‘ढ’ विद्यार्थ्याला समजेल इतके साेपे करून सांगतात. इथे तर प्रपंचात रममाण हाेणाऱ्या संसारी माणसांना देहसुखाचे खाेटेपण सांगावयाचे व पटवून द्यावयाचे आहे. म्हणूनच त्या गुरुजींप्रमाणे श्रीसमर्थ चारीही समासातील गाेष्टीचे तात्पर्य साररूपाने पाचव्या समासाचा उपसंहार करताना पुन्हा स्पष्ट करून सांगत आहेत.
ते म्हणतात की या गाेष्टीवरून व त्यातील प्रपंचातच सर्व सुख शाेधणाऱ्या माणसाच्या म्हातारपणी हाेणाऱ्या अवस्थेवरून श्राेत्यांनी बाेध घ्यावा. विषयवासनांच्या पूर्तीसाठी आयुष्य घालविताना तुमचे तरुणपण संपूर्ण वार्ध्नय येते. शरीरातील श्नती आणि जीवनातील उत्साह क्षीण हाेऊन जाताे. जवळचा पैसाअडका संपून जाताे. अशा तऱ्हेने शरीर आणि संपत्ती यांची पुरती वाताहात हाेऊन जाते. आयुष्यभर ज्या ज्या गाेष्टींचा स्वार्थ केला ताे सर्वच वाया जाताे आणि शेवटी अंतकाळ जवळ आल्यावर सर्वच बाबतीत विपरीत परिस्थिती हाेते. सुखासाठी आटापिटा करून शेवटी दु:खच पदरात पडते आणि मग यमयातनेची भीती वाटू लागते.थाेड्नयात जन्म हेच पुढे भाेगाव्या लागणाऱ्या दु:खाच्या व परिस्थितीच्या भीषण चट्नयाचे मूळ आहे.जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाने हे सत्य ओळखावे.त्यातून सुटका मिळण्यासाठी जाे एकच मार्ग आहे त्याची म्हणजेच परमेश्वरभ्नतीची कास धरावी.