वाच्यार्थ:माणसाच्या वागण्यावरून त्याच्या कुळाची ओळख हाेते, त्याच्या बाेलण्यावरून ताे काेणत्या प्रदेशातून आला, हे समजते.त्याच्या देहबाेलीवरून, हालचालींवरून त्याचे प्रेम समजते आणि त्याच्या शरीरयष्टीवरून त्याचा आहार किती असावा, याचा अंदाज येताे.
भावार्थ: माणसाची (संपूर्ण नाही तरी) बरीचशी ओळख त्याच्या बाह्य रूपावरून हाेते.
1. वागणे - व्यक्तीच्या वागण्यावरून त्याचे संस्कार कळतात. ताे उच्चकुलीन आहे की नीच (संस्कारहीन) कुळातील आहे हे कळते. माेठ्यांचा आदर, स्त्रीदाक्षिण्य, नम्रता आदी शिष्टाचार जर ताे पाळत असेल, तर ताे कुलीन; याउलट जर ताे उद्धट, शिवीगाळ करणारा असेल तर ताे नीच.