3. वाणिज्य - जर स्वतःचा धंदा, पेढी किंवा कंपनी असेल तर केव्हाही चांगले; कारण त्यात स्वातंत्र्य असते, काेणीच आपला वरिष्ठ नसताे. उलट आपणच सर्वे सर्वा असताे म्हणून व्यवहारात व्यापार (धंदा) श्रेष्ठ! 4. दिव्य स्त्री - गुणवान, तेजस्वी स्री गृहस्वामिनी असेल, तर सर्वांचे मन प्रसन्न, आनंदित राहते, अशी गृहस्वामिनी घराची शाेभा वाढविते.
टीप: आजची तेजस्वी स्त्री काेणत्याही स्थानाची-अधिकारपदाची शाेभा वाढविते; परंतु निसर्गनियमानुसार कुटुंबात पत्नी, माता म्हणून तिची जबाबदारी ही सर्वांत महत्त्वाची आहे. घरात बसायला तिला ‘खुर्ची,’ मिळाली नाही तरीही पतीच्या हृदयसिंहासनावर ती विराजित असते.मुलांचे तर ती सर्वस्व असते व कुटुंबीयांच्या ‘मनात घर करते.’
बाेध: समान पातळीवरील व्यक्तींमधील मैत्री राजाची चाकरी, स्वतःचा धंदा आणि सर्वगुणसंपन्न गृहस्वामिनी या गाेष्टी नेहमी श्रेष्ठ ठरतात!