अशा वेळी त्याला आपल्या आईची आणि तिच्या निरपेक्ष प्रेमाची व्याकुळतेने आठवण येते. तिने घेतलेले कष्ट आपण जाणले नाहीत म्हणून ताे दु:खी हाेताे.आईची माया केवळ आईच करू जाणे.मूल कसेही दरिद्री, आजारी असले तरी तिची माया कमी हाेत नाही व ती त्याला पाेटाशी धरते. त्याच्या दु:खाने तिचे अंत:करण दु:खी हाेते. अशा देवस्वरूप आईचे प्रेम आपण कामवासनेत दंग हाेऊन विसरलाे, याने ताे विषण्ण हाेताे. त्या एकलेपणात ताे शाेक करू लागला तरी ऐकायला व समजूत घालावयासही तेथे काेणी नसते आणि ताे तसाच परदेशाची वाट चालत राहताे.
त्याच्या मनातील विचार म्हणून श्रीसमर्थांनी आयुष्याचा सारभूत विचार येथे सांगितला आहे.ते म्हणतात की आईबापांचे उपकार स्मरून जे त्यांच्या आज्ञेत राहतात आणि त्यांची सेवा करतात, तसेच त्यांचे मन दुखावेल असे कधीही वागत नाहीत, उलट त्यांना आनंदात ठेवण्यासाठी अखंड प्रयत्न करतात तीच माणसे जगात धन्य हाेतात! आपण हा उपदेश आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तरच खरा दास-बाेध झाला असे म्हणता येईल.- प्रा.अरुण गाेडबाेले, माे. 9822016299