मूळ भगवद्गीतेत ारसा नसलेला एक विषय अतिशय प्रेमाने ज्ञानेश्वर महाराज येथे वर्णन करतात. गीतेत याेगशास्त्र आहे, पण कुंडलिनीयाेग ही केवळ नाथपंथाची व ज्ञानेश्वरांची देणगी आहे.कुंडलिनी ही एक दैवी शक्ती मानली गेली आहे.आपल्या शरीरात मानल्या गेलेल्या सहा चक्रांचे भेदन करून ही शक्ती वर वर सरकत राहते. मुळात ही मूलाधारचक्रात सर्पाप्रमाणे तीन वेढे घालून सुस्त पडलेली असते. याैगिक प्रक्रियेमुळे ती सावध हाेते.आळाेखेपिळाेखे देते आणि तिचा वेग मस्तकातील सहस्रार चक्राकडे वळताे. या चक्रातील अमृतबिंदू प्राशन केला की तिची आणि याेग्याची तृप्ती हाेते.
या जागृत झालेल्या कुंडलिनीचे वर्णन ज्ञानेश्वरम हाराज करीत आहेत. नागिणीचे अचपळ पिलू जसे कुंकवाने माखले जावे असे तेज या कुंडलिनीला प्राप्त हाेते. ही नाडी लहानशी म्हणजे तीन-साडेतीन वेढ्यांची असून एखाद्या नागिणीप्रमाणे सुप्त असते. ही कुंडलिनी म्हणजे विद्युन्मय वाटते. अग्निज्वालांची ही वळीच वाटते किंवा चांगली घाेटलेली साेन्याची लगड दिसते.नाभिस्थानात सुप्त असलेल्या या कुंडलिनीस वज्रासनामुळे चिमटा बसून ती जागी हाेते आणि मग जसा एखादा तारा तुटावा, सूर्याचे आसन डळमळावे किंवा तेजाचे बी रुजून त्याला काेंब ुटावा, त्याप्रमाणे ही कुंडलिनी नाभिकंदावर उभी राहते. पुष्कळ दिवसांची भूक तिची साठलेली असते.तशात तिला डिवचून जागे केलेले असते. म्हणून ती आपले ताेंड आवेशाने उघडून सरळ वर झपाट्याने निघते. मस्तकातीलसहस्रदलकमलातील अमृतबिंदू प्राशन केल्यावर ती तृप्त हाेते.