तुका म्हणे खाेडी । देवमणी न देती दडी ।।1।।

    10-Nov-2022
Total Views |
 

saint 
 
संसारात अडकलेल्या या जीवाला जेव्हा संसार म्हणजे नेमके काय? त्यात कुठपर्यंत स्वत:ला झाेकावे? त्यात राहून त्यापेक्षा वेगळे राहता येते काय? संसारात राहून संसारापेक्षा वेगळे राहण्यासाठी काय करावे लागेल ? या प्रश्नाची उत्तरे सापडतात, तेव्हा ताे पूर्णत: चांगला हाेऊ शकताे. एकदा का ताे स्वपरिचित झाला की मग त्यात दाेष असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. इतरांप्रमाणे ताे ही संसार करीत असला तरी त्याच्याकडून हाेणारे दाेष, उणिवा, त्रुटी ह्या त्याच्या नसतात.
 
सहज प्रवृत्ती किंवा दैनंदिन वर्तन म्हणून त्याच्याकडून असे कांही घडून गेले तरी ताे त्या वर्तनात अडकत नाही. त्यामुळे हे गुणदाेष त्याला चिकटत नाहीत. एखादा खाेडसाळ घाेडा देवाच्या नांवावर किंवा राज्याच्या नावावर गळ्यात एक देवपणाचे किंवा राज्याच्या आदेशाचे चिन्ह बांधून साेडला तर त्याच्या खाेडी त्या चिन्हाखाली झाकून जातात. त्याप्रमाणे एखाद्या दुर्जनाने जरी चांगल्याचा सहवास मिळविला व चांगुलपणाने वागू लागला तर आपण त्याच्या पूर्वाश्रमीच्या खाेडीकडे दुर्लक्ष करायला हवे.या अनुषंगाने बाेलतांना तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे खाेडी। देव मणी न देती दडी ।। जय जय राम कृष्ण हरी -डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊली निवास, श्री माऊलीनगर, जालना माे. 9422216448