परि आवश्यक पांडवा । ऐसा ठाव जाेडावा। तेथ निगूढ मठ हाेआवा । कां शिवालय ।। 6.179

    10-Nov-2022
Total Views |
 

dyaneshwari 
 
या सहाव्या अध्यायात गीतेमध्ये याेगशास्त्राचे विवेचन आलेले आहे. या विवेचनावर भाष्य करताना ज्ञानेश्वरांनी बरीच भर घातली आहे. ज्ञानेश्वरांचा संप्रदाय हा शिवाेपासक नाथपंथ, या नाथपंथात याेगमार्गाला अतिशय महत्त्व असून पूर्वी ारसा प्रकट न झालेला कुंडलिनीयाेग या अध्यायात ज्ञानेश्वर हे अनुभूतीसंपन्न असल्याकारणाने माेठ्या आवडीने वर्णन करीत आहेत. या राजयाेगाचा एकदा मार्ग दिसला की तहानभूक हरपते.वाटचाल करीत असताना दिवस आणि रात्र यांतील भेद समजत नाही. जेथे पाऊल पडेल तेथे माेक्षाची खाणच उघडते. या वाटेने ज्या गावाला जाण्यासाठी याेगी निघताे ते गावच ताे हाेऊन राहताे. याेगाचा हा अभ्यास आपाेआप घडावा आणि त्यातील रम्यत्वाचा अनुभव हृदयाला सहज यावा.
 
हा याेग ज्या ठिकाणी घडताे ते स्थान समाेर आले असता एखाद्या नास्तिकालाही तपश्चर्या करण्याची बुद्धी व्हावी. एखादा सहज चुकून या ठिकाणी आला तर ताे तेथेच गुंतून पडावा. असे हे स्थळ न थांबणाऱ्याला डांबून ठेवते. भटकणाऱ्याला स्थिर करते.या स्थळावर पाेहाेचले, की वैराग्य जागे हाेते. हे स्थान अतिशय निवांत असावे. शुद्ध असावे. भाेवती याेगाभ्यास करणाऱ्यांची वस्ती असावी. लाेकांची वर्दळ ारशी नसावी. अमृतासारखी गाेड फळे लागणारी झाडे असावीत. येथे ऊन बेताचे असावे. वारा शीतल व मंद असावा. झाडे गर्द असावीत. एखादा हंस पक्षी, चारदाेन पाणकाेंबडे चालतील. काेकीळही चालेल आणि मधूनच माेर प्रकटला तरी त्याला मज्जाव हाेणार नाही.पण अर्जुना, या शाेधून काढलेल्या स्थानी एखादा मठ अथवा शिवमंदिर असावे.