पत्र सत्ताविसावे
रघुपति सहाय हे उर्दू काव्याचे कविश्रेष्ठ म्हणून गणले आहेत. त्यांना 1969 चे भारतीय ज्ञानपीठाचे एक लाख रुपयांचे पारिताेषिक मिळाले. हा समारंभ काही महिन्यांपूर्वी दिल्लीच्या विज्ञान भवनात झाला. पारिताेषिक स्वीकारताना रघुपति सहाय म्हणाले- ‘मानवजातीला ब्रह्मानंद देऊ पाहणारी व्य्नती आयुष्यात खूप दु:ख, दर्द भाेगलेली असते.’ रघुपति सहाय त्यांनी खूप दु:ख भाेगले आहे. त्यांना दारिद्र्याचे चटके बसले आहेत. एक लाख रुपयांचे बक्षीस मिळाल्यावर स्वत:करता, आपल्या कुटुंबाकरता त्यांना काही खर्च करण्याची इच्छा झाली तर त्यात वावगे काय आहे?
दरिद्री माणसाने जन्मभर दरिद्री राहावे अशी अपेक्षा करणे चूक नाही का? पण लाेक माेठे चाेर असतात. त्यांनी सहाय ह्यांना विचारले- ‘आपण लाख रुपये साहित्याच्या मदतीकरता खर्च करणार असाल. आपण काेणत्या साहित्य संस्थेला हे लाख रुपये देणार?’ असे विचारणे म्हणणे रघुपती सहाय यांच्या दारिद्र्यावर चटके देण्यासारखे हाेते.रघुपती सहाय यांनी स्वत:च्या कुटुंबाकरिता या पैशापैकी कशाचाही उपयाेग न करता पुन्हा दारिद्र्यात खितपत पडावे ही अपेक्षा किती क्रूर आहे! रघुपती सहाय म्हणाले- ‘भारतीय संस्कृती भाेगवाद व त्यागवाद ह्या दाेन पायावर उभी आहे. मी खूप त्याग केला आहे. मला भाेग घेण्याचा अधिकार आहे.’ बाेलता बाेलता त्यांनी एक मजेदार गाेष्ट सांगितली-- ते म्हणालेएक तहसीलदार हाेता. त्याने विधवानिधी उभारण्याचे ठरवले.
काही पैसा जमा झाल्यावर सर्व सामसूम झाले. लाेकांनी त्या तहसीलदाराला त्याबद्दल विचारल्यावर ताे म्हणालाअहाे आपले जीवन क्षणभंगुर आहे. आज मी आहे, उद्या मी नाही. उद्या मी जग साेडून गेलाे तर माझ्या विधवा पत्नीचे काय हाेईल?....म्हणून हा पैसा....
ही गाेष्ट सांगून रघुपति सहाय म्हणाले त्या तहसीलदाराप्रमाणे या पैशाने मी स्वत:ला व कुटुंबाला मदत करून साहित्याला मदत करणार आहे.असे पहा पत्रे वाचून माझ्यावर पत्रांचा नुसता पाऊस पडत आहे. त्या पत्रात लाेक खूप स्तुती करतात. एकाने लिहिले आहे.गीतेचे तत्त्वज्ञान जगाला पहिल्या प्रतीचे आहे. ते तत्त्वज्ञान आपल्या आचरणात कसे आणावयाचे ते ‘प्रसाद’ मधील तुमची पत्रे वाचून सामान्य माणसालाद्धा समजून येते. ही पत्रे वाचून माझ्यासारख्या माणसाचे जीवन उच्च हाेण्यास फार मदत हाेते.लाेकांची अशी समजूत झाली आहे की ही पत्रे वाचली म्हणजे आपले कल्याण हाेते.