हे ज्ञान असूनही काेणी निंदक भेटला तरी विरक्ताने त्याची निंदाही शांतपणे ऐकून घेऊन त्याला उत्तर दिले पाहिजे. साधकांना साधनमार्गाचा बाेध केला पाहिजे आणि त्याचबराेबर ज्या ज्या प्रपंची माणसांना परमार्थाविषयी गाेडी उत्पन्न हाेईल अशा मुमुक्षूंना सुयाेग्य शिकवण देऊन माेक्षमार्गाला उद्युक्त केले पाहिजे. या संपूर्ण समासाचे आणि विरक्तपणाचे सार काढणारा ‘नित्यमुक्त’ हा सुरेख शब्द श्रीसमर्थांनी येथे वापरला आहे. विरक्त सदाच मुक्त असताे. जेव्हा त्याला सुखाेपभाेग मिळतील तेव्हाही ताे त्यात गुंतलेला नसताे. ताे त्यापासून अलिप्तच असताे.
गाेंदवलेकर महाराजांनी एके ठिकाणी फार सुरेख उदाहरण दिले आहे. ते म्हणतात पंचपक्वान्नांचे जेवण मिळाले तर ते आनंदाने जेवावे पण उद्या उपवास पडला तर ताेही आनंदाने साेसावा. हे ज्याला साधले ताे खरा विरक्त आणि नित्यमुक्त झाला. आपण असा जाणीवपूर्वक प्रयत्न राेजच्या आयुष्यात केला तर आपल्यालाही नित्य नव्हे पण अधूनमधून तरी मुक्त हाेणे साध्य हाेऊ शकेल हे निश्चित! -प्रा.अरुण गाेडबाेले, माे. 9822016299