जे अमृताची बाेतली । कीं प्रेमचि पिऊन मातली। म्हणाेनि अर्जुनमाेहें गुंतली । निघाें नेणें ।। 5.172

    31-Oct-2022
Total Views |
 
 

Dyneshwari 
या ओवीचा सरळ भावार्थ पाहण्यापूर्वी एका मार्मिक अंगाचा थाेडासा विचार करू.आपण नेहमी असे समजताे की, युद्धभूमीवर सगेसाेयरे पाहून अर्जुनाच्या मनास माेह निर्माण झाला. पण हा माेह खरे पाहता काेणाला निर्माण झाला हाेता? अर्जुनाच्या मनात माेहाच्या रूपाने काेण साकार झाला हाेता? येथे काेण काेणाच्या माेहात गुंतले आहे? अर्जुनाच्या माेहाने खरे पाहता श्रीकृष्ण परमात्माच गुंतून गेले आहेत. त्याचाच माेह परमात्म्यास झाला आहे.या भूमिकेवर या ओवीचा भावार्थ आपण पाहू.ज्ञानी पुरुष यमनियमांचे डाेंगर उतरून अभ्यासाचे सागर तरून जातात. ते म्हणजे केवळ शांतीचे रूप असते.वासनारहित ब्रह्मस्वरूप म्हणजे ते हाेत. हे समजावून सांगताना श्रीकृष्ण म्हणतात की, अर्जुना, माझे ह बाेलणे ऐकून तुला आनंद झालेला दिसताे.
 
त्यावर अर्जुन म्हणाला, देवा, तू अंतर्यामी आहेस. दुसऱ्याच्या चित्तातील तू बराेबर ओळखताेस. माझ्या मनातील भाव तू ठीकजाणलास. जे काही मी विचारणार हाेताे ते तू अगाेदरच जाणलेस. पण ते मला स्पष्ट करून सांग ना. अधिक साेपे करून या सरळ मार्गाची वाट दाखव ना. म्हणून देवा, पुन्हा एकदा साेप्या रीतीने या मार्गाची ओळख करून द्या. तेव्हा भगवंत म्हणाले, अर्जुना, तुला जाे मार्ग उत्तम वाटताे ताेच आम्ही तुला आनंदाने सांगत आहाेत.तू लक्ष देऊन ऐकशील तर आम्ही सांगण्यास संकाेच का करावा? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, आधीच आईचे चित्त प्रेमळ असते, मग आवडत्याचा विषय निघाला की त्याचे वर्णन काय करावे? भगवंतांची मूर्ती अर्जुनाच्या प्रेमामृताने ओतलेली आहे.त्याच्या माेहाने ते आसक्त झालेले आहेत. म्हणून असे विषयांतर वारंवार हाेते.