गीतेच्या गाभाऱ्यात

    31-Oct-2022
Total Views |
पत्र सव्वीसावे

Bhagvatgita
निकटवर्तीयांना माणसाचे दाेष समजतात. पत्नीला तर ते बराेबर समजतात.तू माझ्यावर अंधभ्नती करू नकाेस. मी एक सामान्य माणूस आहे. माझ्यातले दाेष पाहण्याने पातिव्रत्याला बाध येताे अशी समजूत तू कदापि करू नकाेस.पतीपत्नींनी परस्परांचे गुणदाेष समजून घ्यावयाचे जेणेकरून गुणांचा गुणाकार हाेईल व दाेषाचा भागाकार हाेईल असा प्रयत्न दाेघांनीहातात हात घालून करावयाचा व परमार्थाच्या प्रांतात देवाच्या दिशेने मार्ग आक्रमावयाचा ह्यातच संसाराचे सार्थक आहे.इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिच्या सॅड्रिंगहॅम उद्यानातील एका माळ्याने सेवानिवृत्तीनंतर आपल्या चाळीस वर्षांच्या आठवणी लंडनच्या स्पे्नटॅटर पत्रात प्रसिद्ध केल्या.राणीचे गुण सांगणे ठीक आहे, पण तिचे दाेष सांगणे बराेबर आहे का, ह्याबद्दल आज सुधारलेल्या विसाव्या शतकात सुधारलेल्या इंग्लंड देशात विद्वान लाेकात वाद सुरू आहे.
 
परमार्थाच्या प्रांतात प्रवास करणाऱ्या लाेकांना वाटते, की ह्या वादात अर्थ नाही. माेठ्या माणसाचे चरित्र सांगताना चरित्रकाराने सत्यरूपी प्रकाशाचा झगझगीत झाेत टाकण्याच्याऐवजी सारे दाेष झाकून टाकणारा, गुण खूप माेठे दिसणारा, नजरबंदी करणारा प्रकाश टाकावा हा विचार परमार्थाला मान्य नाही.तू एके ठिकाणी वाचलेस की - देह जाळल्याशिवाय देव भेटत नाही. हे मत बराेबर नाही.जाळायचा असताे माेह. देह नव्हे. देह देवाचे मंदिर आह ते जाळून कसे भागेल? साधकाची साधना म्हणजे देहदंड नव्हे तर देहाचा विसर.देहाचा विसर पडल्यानंतर अहंकारनाशाचा प्रकाश पडल्यानंतर अंतरंगातील देव दिसू लागताे व ताे नंदगाेपाळ दिसू लागल्यावर आनंदाचा सुकाळ हाेताे. हा आनंद आठवायचा नसताे, वाटावयाचा असताे. आनंद वाटून कमी हाेत नाही.विहिरीचा जितका उपसा करावा तितकी ती ताज्या पाण्याने भरून येते तसा प्रकार हाेताे.
 
*** तुझ्या शंका मी विचारात घेतल्या. तुला एक गुह्य सांगू? अग! देव, दानव -सारे मानवातच आहेत. नारद मात्र असा आहे की देव, दानव मानव हे सारख्याच अगत्याने त्याचे स्वागत करतात. आत्मारामाचे गुणगान करणाऱ्या नारदाची भूमिका आपण घेतली म्हणजे आपल्यातीलदेव, दानव व मानव ह्यांच्यातील श्नितकेंद्रे आकर्षिली जातात व त्रिवेणी संगम हाेऊन आनंदाच्या लाटांवर आपण नाचू लागताे.
 
*** तू संसार व संन्यास ह्याबद्दल लिहिले आहेस.संसार म्हणजे स्वजनवास, संन्यास म्हणजे विजनवास.संसारात व्यवहार ग्राह्य संन्यासात व्यवहार त्याज्य स्वजनवास व विजनवास यांचा जेथे एकत्र वास हाेताे व संसार व संन्यास ह्यांचा जेथे संगम हाेताे तेथे संत दिसू लागताे.
 
*** तू आपल्या पत्रात शेवटी माेठा मजेशीर प्रश्न विचारला आहेस. या प्रश्नाची जात व पाेत आगळी नि वेगळी आहे.तू लिहितेस.