आत्मज्ञान झालेल्या पुरुषाचेच अधिक वर्णन या ओवीत ज्ञानेश्वर करीत आहेत.विषयभाेगात सुख नाही हे त्याला पूर्णपणे कळलेले असते. ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी विषयभाेगाची इच्छा नसते. ताे देहधारी असला तरी त्याने आपले विकार स्वाधीन ठेवलेले असतात. ताे आत्मसुखात रमलेला असल्यामुळे त्याला बाह्यसृष्टीचे ज्ञान नसते.पक्षी जसा वेगळा राहून फळाचा आस्वाद घेताे, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष वेगळा तर राहताेच, पण भाेक्तेपणाचे ज्ञानही उरत नाही. शेवटी त्याचे चित्त केवळ सुखरूपच बनून जाते. असा आत्मानुभव ज्यांना आला आहे. त्यांना या सुखाच्या खुणा जाणवतात.असे पुरुष स्वभावत:च आत्मरत असल्याकारणाने सामरस्याच्या जणू मूर्तीच आहेत किंवा ज्ञानेश्वरांच्या मताने ते म्हणजे ब्रह्मानंदाला आलेले आकार आहेत किंवा या आनंदास ुटलेले अंकुर आहेत.
अथवा ते म्हणजे आत्मज्ञानाची एक क्रीडाच आहेत. विवेकाचे मूळ गाव, त्याची मूर्ती त्यांच्या रूपाने ध्यानात येते.ते म्हणजे परब्रह्म असल्याकारणाने त्यांचे अवयव ब्रह्मविद्येच्या अलंकाराने सुशाेभित झालेले असतात.ते प्रत्यक्ष चैतन्याचेच अवयव हाेत.ज्ञानी पुरुषाचे हे वर्णन ऐकून श्रीगुरू निवृत्तिनाथ म्हणाले, ज्ञानेश्वरा, आणखी किती वर्णन करणार आहेस? संतांचे गुणवर्णन करताना तू इतका रंगून जाताेस की, तुला त्याचे भान राहत नाही. तू सगुणरूपाचेही वर्णन करताेस आणि तितकेच गाेड वर्णन निर्गुणरूपाचेही करताेस. आता हा पसारा आवरून घे. ग्रंथाचा अर्थरूपी दिवा लाव आणि श्रवण करणाऱ्या संतश्राेत्यांच्या