पत्र सव्वीसावे तू गीतेच्या अंतरंगात जा. कृष्णाची खरी भ्नत हाे आणि मग अस्पृश्यतेबद्दल तुला काय वाटते ते तूच सांग.कृष्णाचा धावा करताना जर कृष्ण तुझ्या स्वप्नात आला तर ताे तुला सांगेल- ‘अस्पृश्यता वाईट विचारांच्या बाबतीत पाळा. वाईट विचारांना स्पर्श करू नका. जर वाईट विचारांना स्पर्श झाला तर पश्चात्तापरूपी पाण्याने आंघाेळ करून स्वच्छ व्हा’ तू आपल्या पत्रात लिहितेस- महर्षी कर्वे पुण्यस्मरण व्याख्यानमालेसाठी तुम्ही पुण्याला गेला. हिंगण्यास दाेन तीन दिवस कर्वे यांच्या झाेपडीत राहिला. त्यांच्या झाेपडीचा बाह्य देखावा अजून म्हणे पूर्वीप्रमाणे ठेवला आहे. शे्नसपीअर ज्या झाेपडीत रहात हाेता ताे देखील पूर्वीप्रमाणे ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
तुम्ही कर्व्यांच्या झाेपडीत रहात असताना तुमच्या मनात काेणता विचार प्रामुख्याने आला, ते जाणून घेण्याची मला फार इच्छा आहे. कृष्णाचा भ्नत गीतेचा पाईक- कर्व्यांच्या झाेपडीत राहात असताना त्याच्या मनात काेणत्या विचारांना प्राधान्य मिळते ते समजून घेणे माझ्यासारख्या गीताप्रेमी स्त्रीला नितांत आवश्यक आहे-’ *** असं पहा त्या झाेपडीचा बाह्य देखावा पूर्वीप्रमाणेच ठेवला आहे. दारे खिड्नया पूर्वीच्याच आहेत, नाव ‘झाेपडी’ असेच ठेवले आहे. तेथील लाेकांनी शे्नसपीअरच्या झाेपडीवरून ही कल्पना सुचली असे मला सांगितले. झाेपडीच्या आत मात्र सर्व आधुनिक साेयी आहेत. बाहेर दिसायला झाेपड पण आत आधुनिक सर्किट हाऊसमधील खाेली असा प्रकार आहे. तेथल्या लाेकांनी माझे आदरातिथ्य फार चांगले केले.
शे्नसपीअसरची नाटके पाहून, त्याचे स्त्रीस्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण पाहून आपण स्तिमित हाेताे.Fraility thy name is womanहे वा्नय आपल्या ओठावर खेळत राहते.हॅम्लेटची बदफैली आई, त्याची प्रेयसी ऑफिलिया, सीझर, अंॅटनी यांना रसातळाला नेणारी ्निलओपात्रा, अशा स्त्रिया शे्नसपीअरने रंगवल्या आहेत. त्याचप्रमाणे डेस्टाेमाेना, पर्शिया, लेडी मॅकबेथ, असे स्त्रीजातीचे नमुने शे्नसपीअरने चितारले आहेत. त्याचे स्त्रीजातीचे निरीक्षण इतके सूक्ष्म आहे की ते पाहून आपण अवाक् हाेताे.
पण- भ्नितप्रेमाने न्हाऊन निघालेल्या मातेचे चित्र शे्नसपीअरच्या वाङमयात काेठे आहे? मी महर्षी कर्वे यांच्या झाेपडीत राहू लागलाे आणि मला मातृप्रेमाचे मंगल नाद निनाद ऐकू येऊ लागले. महर्षी सर्वांचे माऊली हाेते. म्हणूनच सर्व लाेक त्याच्या पाऊली नतमस्तक हाेत हाेते.महत्त्वाकांक्षेने भरलेली स्त्री शे्नसपीअरच्या वाङमयात आहे, पण त्यागाने न्हाऊन निघालेली, दु:खात सुख मानणारी, जीवनाचं मंगल करणारी माता त्यांच्या वाङमयात काेठे आहे? म. कर्वे यांच्या झाेपडीत मातेच्या माऊलीचा, आईचा, अंबेचा आवाज माझ्या कानात घुमू लागला व नकळत माझ्या ताेंडून एकदम शब्द आल