‘‘आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल, तर हिंमत पाहिजे. जिकडे जग वाहावत चाललेय तिकडे तुम्हीही वाहावत गेलात, तर त्यात पराक्रम कसला? जिकडे जग वाहावत चाललेय तिकडे तुम्हीसुद्धा वाहावत जाल, तर तुम्हाला लाेक प्रेतवत समजतील. बहादूर बनायचे असेल, तर प्रवाहाविरुद्ध प्रवास करायला शिका. तुम्हाला तुमच्या हातापायांची शक्ती प्रवाहाविरुद्ध पाेहताना खऱ्या अर्थाने आजमावून पाहता येते.’’