चाणक्यनीती

    19-Oct-2022
Total Views |
 

Chanakya 
 
2 बक : बगळा हा एक पांढरा, उडणारा आणि पाण्यातही दिसणारा पक्षी; पण रंग, रूप, चाल यात हंसापेक्षा कितीतरी डावाच.
जे माता-पिता मुलाला जीवनावश्यक (व्यवहार, ज्ञान) धडे देत नाहीत, त्याचा कल ओळखून त्याला त्या-त्या कला, विद्या शिकवित नाहीत ते आपल्या मुलांचे व आपलेही नुकसान करतात व पाल्यांचे शत्रू तर ठरतातच शिवाय स्वत:चे शत्रू स्वत:च हाेतात.कारण अज्ञानी व्य्नतीच्या बुद्धीचा, व्य्नितमत्त्वाचा याेग्य विकास न झाल्याने तिचे जीवन व्यर्थ जाते आणि विद्वानांच्या सभेमध्ये तर अशी व्य्नती जनमानसावर आपल्या बुद्धीची छाप पाडू शकत नाही, मतप्रदर्शनही करू शकत नाही.
 
बाेध : हंस आणि बगळा रंगाने पांढरे असले, तरी ‘नीरक्षीरविवेकाची’ क्षमता फ्नत हंसातच असते; तसा विद्वानांच्या सभेत मूर्ख वेगळाच दिसताे. आपल्या मतांचा प्रभाव ताे इतरांवर टाकू शकत नाही.