ओशाे - गीता-दर्शन

    18-Oct-2022
Total Views |
 
 

Osho 
 
माझा डाेळाफुटलाआपला डाेळा नाही म्हणत, - जर माझे डाेळेफुटले, माझे कान तुटले, माझे हात तुटले, मला जीभ नसेल, मला नाक नसेल तर तेव्हा मी काय असेन? काहीही उरणार नाही. या पंचेंद्रियांच्या मेळ्यातून एकेक करून इंद्रिये काढून टाकली तर मागे काय उरेल? काही शिल्लक राहीलसे वाटत नाही.माणसाचा डाेळा गेला की निम्मा माणूस खलास. कानही गेले की आणखी खलास. हात गेले की आणखी संपला. जर आपली पाचही इंद्रिये हिरावून घेतली, आपल्याला काही करून जिवंत ठेवता येणे शक्य झाले तर आपल्यामध्ये काय उरेल? काहीही उरणार नाही. कारण आपला सारा अनुभव इंद्रियांच्या मेळ्याचाच आहे. मी काेणी आहे असे मला जे वाटते ते फक्त इंद्रियांचा जाेड आहे.
 
‘मी फक्त इंद्रियांचा जाेड आहे असे ज्याला वाटते ताे इंद्रियाच्या आसक्तीतून मुक्त हाेईल काय? मी फक्त इंद्रियांचा जाेड असेन तर इंद्रियासक्तीतून मुक्त हाेणे म्हणजे केवळ आत्म घात, बाकी काही नाही. मी मरून जाईन, बाकी काही एक हाेणार नाही. पण कृष्ण तर म्हणताे की जाे इंद्रियासक्तीच्या पार गेला ताे याेगारुढ झाला.ताे म्हणताे की ताे मरणार तर नाहीच, उलट त्याला पूर्ण अर्थाने जीवन मिळेल. पण आपल्याला त्या जीवनाचा काहीच पत्ता नाही. इंद्रियमेळा हेच तर आपल्या जीवनाचे सर्वस्व आहे. आपल्या इंद्रियांचे अनुभव जर एक एक करून छाटून टाकले तर खाली फक्त शून्य उरेल. म्हणजे काहीही उरणार नाही. हाती काहीही येणार नाही सगळा मेळा विसकळीत हाेऊन जाईल. तर मग आपणास इंद्रियासक्तीतून कसे सुटता येईल?