पत्र पंचविसावे
धृतराष्ट्राचे भाषण ऐकून विदुर त्याला म्हणाला.‘‘राजा! तू कृष्णाचा माेठा सत्कार करणार आहेस, पण हा सत्कार कपटाचा आहे. पांडव पाचच गावे मागत आहेत, पण ती त्यांना देऊन तुला त्यांच्याशी सख्य करायचे नाही.द्रव्याची लालूच दाखवून कृष्णाला पांडवांपासून फाेडावा हा तुझा पाेटातला डाव आहे. पण राजा मी तुला सांगताे कृष्ण फार निराळा आहे. ताे तुझ्याकडून पाय धुण्याकरिता लाेटाभर पाणी याशिवाय दुसरे काहीही घेणार नाही.’’ कृष्ण हस्तिनापुरात आला तेव्हा सारे शहर त्याच्या सन्मानार्थ लाेटले. त्याची उतरण्याची व्यवस्था केली गेली हाेती पण कृष्ण काेठेही न जाता थेट विदुराचे घरी मु्नकामास गेला.विदुराच्या घरी कृष्णाला पाहिल्यावर कुंती डाेळ्यात अश्रू आणून त्याला म्हणाली.
‘‘कृष्णा, युधिष्ठिराला सांग की तुझा क्षात्रधर्म कमी पडत चालला आहे. आता तरी हे खूळ पुरे कर. भीम व अर्जुन यांना सांग की क्षत्रिय स्त्री ज्या कारणासाठी पुत्रांना जन्म देते ताे समय जवळ आला आहे. अर्जुनाला असेही सांग की त्याच्या हातून जर काही हाेत नसेल तर त्याने बांगड्या भराव्या. नकुल सहदेवांना सांग की जीवितापेक्षा पराक्रमाला जास्त महत्त्व आहे.कृष्णा! काैरवांनी माझ्या मुलांचे राज्य हिसकावून घेऊन त्यांना वनात हाकून दिले त्यामुळे मला फारसे दु:ख झाले नाही. पण माझ्या लाड्नया द्राैपदीचा ती रजस्वला व एकवस्त्रा असतानादुष्टांनी जाे दारूण अपमान केला ते दु:ख कृष्णा! मला सारखे सलते आहे रे!’’ कृष्णाने कुंतीचे सांत्वन केले व नंतर ठरल्या दिवशी ठरल्या वेळेला शिष्टाई करण्याकरता ताे सभेत गेला.
कृष्णासारखा व्नता व कृष्णासारखा रूपवान पुरुष त्या काळी दुसरा काेणी नव्हता. त्याचे भाषण ऐकण्यास सारे लाेक उत्सुक झाले हाेते. महाभारतात म्हटले आहे की कृष्ण त्या सभेत आल्यावर अमृत पुरेसे हाेत नाही त्याप्रमाणे राजांचे कृष्णाकडे पाहणे पुरेसेच हाेईना. सारे लाेक त्याला निरखून पाहात हाेते.कृष्ण बाेलू लागला- ‘‘हे भरतश्रेष्ठा धृतराष्ट्रा, काैरवपांडवांचा समेट व्हावा व युद्ध टळावे एवढेच मागणे मागण्याकरिता मी तुझ्याकडे आलाे आहे.तू ज्ञाता आहेस. तू आपले पुत्रांना ताळ्यावर आण. मी पांडवांना आवरताे. युद्ध झाले म्हणजे असंख्य जीव मारले जातील. ते टाळण्याकरता मी तुझ्याकडे आलाे आहे. समेट हाेऊ द्या, आणि द्वेषाचे रूपांतर प्रेमात हाेऊ द्या. अरे, पांडव पाेरपणीच पाेरके झाले. तूच त्यांना लहानाचे माेठे केलेस. वस्तुत: तूच त्यांना पित्याप्रमाणे आहेस. पांडव तुझ्याकडे पिता म्हणून पहात आहेत. अरे, पांडव म्हणजे तू पाणी घातलेली राेपे आहेत.
त्यावर कुऱ्हाड घालू नकाेस. तू धर्माने चाल व पांडवांना न्याय दे. त्यांचा याेग्य ताे वाटा त्यांना दे व कृतार्थ हाेऊन आपल्या पुत्रासह सुखाने कालक्रमणा कर-’ कृष्णाने माेठे भाषण केले. ते इतके परिणामकारक झाले की सारे राजे कृष्णांची तारीफ करू लागले. कृष्णाचे भाषण झाल्यावर परशुराम, कण्व, नारद, भीष्म, द्राेण, व्यास वगैरेनी दुर्याेधनाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण सारे फुकट गेले. गर्वाने फुगून जाऊन दुर्याेधनाने उद्धट उत्तर दिले व शेवटी म्हटले की कृष्णा! तुला थाेड्नयात सांगताे की मी जिवंत असेपर्यंत तीक्ष्ण सुईच्या अग्रावर राहील इतकी माती देखील पांडवांना युद्धाशिवाय मिळणार नाही.’’ नंतर दुर्याेधनाने आपल्या मित्रांशी खलबत करून असे ठरवले की- कृष्ण माेठा चलाख आहे. त्याने राजा धृतराष्ट्र व पितामह भीष्म यांच्यावर देखील माेहिनी घातली आहे. परंतु त्याला म्हणावे की इंद्राने जसे जबरीने बळीला बांधून टाकले त्याप्रमाणे आम्हीच तुझ्या मुस्नया आवळून टाकताे.