न कळे सतत हिताचा विचार । ताें हे दाराेदार खाती फेरे ।।2।।

    17-Oct-2022
Total Views |
 
 

Saint 
 
उघडपणे वाईट वागणाऱ्यांपेक्षा चांगुलपणाच्या नावाखाली वाईट वागणे अत्यंत घातक असते. ज्या ढाेंगी लाेकांना लाेक संत, महात्म्यांचे स्थान देतात, त्याच ढाेंग्यांना जर आत्मत्त्व, आत्मज्ञान म्हणजे नेमके काय? हे समजत नाही व स्वार्थाशिवाय काही सुचत नाही तर ताेही सामान्याप्रमाणे जन्म मरणाच्या दाराच्या फेऱ्या मारण्याशिवाय काही करीत नाही.चांगल्यांच्या नावाखाली जर समाजाची लूट झाली तर समाजाचा चांगल्या लाेकांवरील विश्वास उडू लागताे.चांगल्या लाेकांवरील विश्वास उडणे हे समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक असते. या घातकीपणाला बळी पाडणाऱ्यांना प्रत्येकाने आपआपल्या परीने राेखले पाहिजे.
 
कारण स्वार्थी, ढाेंगी साधूंकडे पाहून चांगल्या संत, महात्म्यांवरील विश्वास उडणे हे आपणा काेणाच्याही हिताचे नाही. आपणाला आपला खरा परिचय करून देण्याचे सामर्थ्य केवळ, संत, महात्म्यांमध्ये, कीर्तन, प्रवचनकारांमध्येच आहे. आपली संत,महात्म्यांवरील श्रद्धा टिकून राहण्यासाठी या क्षेत्रात शिरलेल्या स्वार्थी, ढाेंगी लाेकांना त्यांची खरी जागा दाख्विण्याचे काम खऱ्या साधू संतांना व आपणालाच करावे लागणार आहे. महाराजांच्या अभंगाचे अर्थ यापेक्षाही वेगळे असू शकतात. त्यामुळे मूळ गाथा वाचावी. आमची चूकभूल पदरात घ्यावी.
जय जय राम कृष्ण हरी.
-डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊली निवास, श्री माऊलीनगर, जालना माे. 9422216448