ओशाे - गीता-दर्शन

    17-Oct-2022
Total Views |
 
 

Osho 
म्हणून ‘मी सुख खरीदून देईन’, ‘मीच सुख खरीदून देईन’ असे आश्वासन धन देते. प्रत्यक्ष खरेदी हाेते दु:खाची, पण आश्वासन सुखाचेच. सर्वच नरकांच्या प्रवेशद्वारावर जी पाटी झळकत असते ती स्वर्गाची असते, म्हणून प्रवेश जरा सांभाळूनच केलेला बरा.
पाटी तर स्वर्गाची आहे. नरक चालकांची हुशारी जरुर वाखाणण्यासारखी आहे-निदान नेमप्लेट तरी स्वर्गाची लावतात खरी. नाहीतर काेण आत पाऊल टाकणार? जर स्पष्ट ‘नरक’ अशी पाटी लावली तर काेणीच आत प्रवेश करणार नाही.तर कृपा करून अशा भ्रमात राहू नका की नरकाच्या प्रवेशद्वारावर दाेन हाडकांचा क्राॅस आणि त्यावर एखादा कवटीचा चेहरा यांचे चित्र असेल. अन् त्याच्यावर लिहिले असेल ‘डेंजर, खबरदार, इनिफनीट व्हाेल्टेज.’ असे काही असणार नाही.
 
तेथे लिहिलेले असते-‘स्वर्ग’ या येथेच कल्पवृक्ष आहे. तेव्हा काेठे लाेक ‘नरक’ प्रवेशात उद्युक्त हाेतील. प्रवेश तर सारेजण स्वर्गात करतात पण पाेहाेचतात मात्र नरकातच. सगळीच दारे स्वर्गाचीच भासतात.इंद्रियांना तृप्ती पाहिजे असते. ही तृप्ती देवविण्याचे आश्वासन धन देते. जीवन कर्मात गुंतून जाते. कर्माची आसक्ती ही मुळात इंद्रियांच्या तृप्तीसाठी धावाधाव आहे. म्हणून कृष्ण म्हणताे- ‘इंद्रियामध्ये ज्याची आसक्ति रहात नाही’. काेणाची आसक्ती इंद्रियात राहणार नाही? इंद्रियांच्या मेळाव्याशिवाय आपल्यात आणखीही काही असते, याची जाणीवसुद्धा आपल्याला असत नाही. आहे का आणखी वेगळे तत्त्व?