गीतेच्या गाभाऱ्यात

    17-Oct-2022
Total Views |
 
पत्र पंचविसावे
 
 
Bhagvatgita
 
संजयाच्या भाषणाला उत्तर म्हणून उद्याेगपर्वाच्या एकाेणतिसाव्या अध्यायात कृष्णाने जे माेठे भाषण केले ते गीतेचे तत्त्वज्ञान समजून घेण्याकरता फार उपयु्नत आहे.तू असे लक्षात घे कीत्या भाषणात कृष्णाने नुसत्या ज्ञानाची महती गायिली नाही, तर कर्मयु्नत ज्ञानाची महती गायिली आहे.वडिलार्जित राज्यापैकी निम्मा हिस्सा पांडवांना मिळाला हाेता. पांडवांनी नंतर स्वपराक्रमाने आणखी राज्य मिळवले हाेते. कृष्णाचे म्हणणे असे हाेते कीहा सारा भाग पांडवांच्या वनवासाच्या काळात काैरवांच्याकडे ठेव म्हणून हाेता व तेरा वर्षांनंतर ठरल्याप्रमाणे ताे सारा भाग काैरवांनी पांडवांना देणे न्याय्य आहे.धर्मराज युद्ध टाळण्याला अनुकूल हाेता. वडिलार्जित राज्य काही मिळाले नाही व पांडवांनी स्वपराक्रमाने जे राज्य मिळवले आहे ते जरी काैरवांनी परत दिले तरी धर्मराज खुश हाेता.
 
शेवटी धर्मराजाने संजयाबराेबर उद्याेगपर्वाच्या एकतिसाव्या अध्यायात दुर्याेधनाला निराेप पाठवला की, ‘‘आमचे वनवासात खूप हाल झाले. आता तरी आमचा याेग्य वाटा आम्हाला मिळाला पाहिजे. याकरिता दुर्याेधना तू अधाशीपणा साेडून दे.... शेवटी मी तुला सांगताे की आम्ही पाच भाऊ आहाेत. निम्मे राज्य राहू दे. आम्हाला पाच गावे दिलीस तरी चालेल व युद्ध हाेणार नाही. अविस्थल, वृक्षस्थल, माकंदी, वारणावती ही चार व तुला वाटेल ते पाचवे अशी पाच गावे आम्हाला दे. कारण माझी इच्छा आहे की युद्ध न हाेता आपण शम करावा.’’ धर्मराजाचा निराेप घेऊन संजय तिकडे गेला व इकड कृष्णाने पांडवांचा विचार ऐकून घेतला व ताे शिष्टाई करण्यासाठी निघाला.
 
कृष्णाला माहित हाेते की दुर्याेधन आपसात तडजाेड करणेस तयार हाेणार नाही. कृष्णाने तसे बाेलूनही दाखवले पण ताे म्हणाला.
‘शम हाेण्याकरता आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणे उचित आहे’ कृष्ण शिष्टाईसाठी निघाला. त्याचेबराेबर हत्यारबंद दहा महारथी, एक हजार पायदळ, एक हजार स्वार व शेकडाे सेवक व विपुल अन्नसामग्री हाेती.कृष्ण म्हणाला हाेता की- आपण जरी दूत म्हणून जात असलाे तरी बेसावध असता कामा नये. काेणत्याही प्रसंगाला ताेंड देण्यास सज्ज असले पाहिजे.वाटेत जिकडे तिकडे कृष्णाचा न भूताे न भविष्यति असा सत्कार हाेत हाेता. लाेकांचे थवेच्या थवे वाटेवर येऊन कृष्णाची मार्गप्रतीक्षा करत व त्याचे दर्शन घेऊन स्वत:ला धन्य मानीत.
 
धृतराष्ट्र विदुराला म्हणाला- ‘‘कृष्ण फार माेठा आहे. त्याला मी खूप माेठा नजराणा देऊन संतुष्ट करणार आहे’’ तू असे लक्षात घे की- कांही लाेकांना मनाची लाज नसते, पण जनाची लाज असते. धृतराष्ट्र हा अशा लाेकांपैकी आहे.दुसरे काही लाेक असे असतात की त्यांना जनाची लाज असत नाही. पण मनाची लाज असते. विदुर हा अशा लाेकांपैकी आहे. तिसरे काही लाेक असे असतात की त्यांना जनाची लाज असत नाही व मनाचीही लाज असत नाही. दुर्याेधन हा अशा लाेकांपैकी आहे. चवथे काही लाेक असतात की त्यांना जनाची लाज असते व मनाचीही लाज असते. धर्मराज हा अशा लाेकांपैकी आहे.