शेजार असता रामाचा। दु:खाची, काळजीची काय वार्ता

    15-Oct-2022
Total Views |
 
 

Gondavlekar 
 
प्रपंचातील हानी याहून नाहीं दुसरी हें जरी आहे सत्य. तरी करावा थाेडासा विचार. ज्याला म्हणावें मी ‘माझें’. त्यावर माझी सत्ता न गाजे. स्वत:चा नाहीं भरंवसा हे अनुभवास येई.परि वियाेगाचें दु:ख अनिवार हाेई. तुम्ही विचारी, सुज्ञ आहांत. थाेडासा करावा विचार. सर्व सत्ता रामरायाचे हाती. तेथें आपल्या मानवाची काय गती? विचारानें दु:ख सारावे. सर्वांचे समाधान राखावें सर्व केलें रामार्पण. हा नव्हे शब्दाचा खेळ जाण.अर्पण केल्याची खूण. न लागावी काळजी तळमळ जाण परमात्म्याचे रक्षण. काेणतेही स्थळीं काेणतेही काळी, असते हा भरंवसा. याचा अनुभव प्रत्येकास आहे खासा.
 
ठेवा रामावर पूर्ण विश्वास. न करावे उपासतपास. उपास हा शब्द अलिकडील जाण.त्याच्यापुढें एक पाऊल टाकून. उपासनेंत राहावें आपण. तेथें आहे निर्धास्तपण उपासापुढील ठाण.उपासना मुख्य जाण. उपासनेंत राहावें आपण.हेंच रामाचें सान्निध्य जाण. शेजार असता रामाचा.दु:खाची काळजीची काय वार्ता. जैसा सूर्य प्रकाशता.काळाेखाचा नाश हाेईल तत्त्वत्ता. एवढें आता ऐकावे