तंववरी तुमचें बळ । जंव आला नाहीं काळ ।।1।।

    14-Oct-2022
Total Views |
 
 
 

saint 
 
 
बुद्धी असल्यामुळे माणूस स्वत:ला बलशाली समजताे. इतर प्राण्यांच्या तुलनेत माणूस खराेखर बलशाली आहे सुद्धा. पण दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते की, बुद्धीमुळे मिळालेले बळ माणूस सत्कार्यासाठी वापरेलच असे मात्र नाही. या बळाच्या गैरवापरामुळे समाजात नकाे त्या गाेष्टी घडत आहेत. मानव केवळ बुद्धीमुळेच स्वत:ला बलशाली समजताे असे नाही. तर संपत्ती, सत्ता, साैंदर्य आदीमुळेही ताे स्वत:ला बलवान समजताे. याेगायाेग कसा आहे पहा, सत्ता, संपत्ती आणि साैंदर्य हे तिन्ही शब्द स या अक्षरापासून सुरुवात हाेतात आणि संपणे हा शब्दसुद्धा स या अक्षरापासूनच सुरुवात हाेताे. ज्याला या दाेन स चा संबंध लक्षात आला ताे कदाचित बलवानपणाचा अभिमान बाळगणार नाही.
 
सत्ता, संपत्ती, साैंदर्य हे एके दिवशी नाश पावणारच आहे. त्यामुळे यांचा अहंकार बाळगण्याचे कारण नाही. मानवाचे सर्व प्रकारचे बळ हे फक्त ताेपर्यंतच आहे, जाेपर्यंत काळाचे आगमन हाेत नाही. काळाचे आगमन झाले म्हणजे सर्व बळ आपाेआप नष्ट हाेते.
त्यामुळे अशा नष्ट पावणाऱ्या बळावर अभिमान बाळगून हा देह वाया न घालवता माणसाने स्वत:ची ओळख करून घ्यावी. महाराजांच्या अभंगाचे अर्थ यापेक्षाही वेगळे असू शकतात. त्यामुळे मूळ गाथा वाचावी. आमची चूक भूल पदरात घ्यावी. जय जय राम कृष्ण हरी। -डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊली निवास, श्री माऊलीनगर, जालना माे. 9422216448