गीतेच्या गाभाऱ्यात

    14-Oct-2022
Total Views |
 
 
पत्र पंचविसावे
 

Bhagvatgita 
 
साऱ्या महाभारतावरून तुला समजून येईल की कृष्णाच्या मनाचा ताेल केव्हाही गेला नाही.चाैथ्या अध्यायात राजा द्रुपद म्हणाला.
‘दुर्याेधन गाेडीने राज्य देणार नाही. धृतराष्ट्र त्यालाच अनुसरेल. अन्नाचे ओशाळे म्हणून भीष्म व द्राेण त्याच्याप्रमाणे चालतील व मूर्ख म्हणून कर्ण, शकुनी दुर्याेधनाचे ऐकतील. बलरामाचे म्हणणे मला पटत नाही दुर्याेधनासारख्या पापनिष्ठाशी नरमाईने बाेलणे म्हणजे गाढवाला गाेंजारण्याप्रमाणे आहे. आपण आता सैन्य जमवण्याचा प्रयत्न करू, येथील राजांची रीत अशी आहे कीज्याच्याकडून पहिली प्रार्थना येईल त्याची बाजू घेऊन त्याला युद्धात साहाय्य करावयाचे.म्हणून म्हणताे आपण निरनिराळ्या राजांच्याकडे ताबडताेब बाेलावणे पाठवा. माझा उपाध्याय विद्वान ब्राह्मण आहे.
 
त्याला दूत म्हणून धृतराष्ट्राकडे पाठवा व धृतराष्ट्र काय म्हणताे ते आपण समजून घेऊ-’ पाचव्या अध्यायात कृष्ण म्हणाला- ‘‘राजा द्रुपद म्हणतात ते याेग्य आहे. कारण आता घराकडे जाऊ, वयाने ज्ञानाने द्रुपद महाराज सर्वांत वृद्ध आहेत.त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काैरवांच्याकडे दूत जाऊ द्या.’’ *** नंतर कृष्णाची मदत मागण्याकरिता अर्जुन व दुर्याेधन द्वारकेस गेले. त्यावेळी कृष्ण निजला हाेता, प्रथम दुर्याेधन आत शिरला व कृष्णाच्या उशाशी एका उच्च आसनावर बसला. अर्जुन नंतर आत गेला व कृष्णाचे पायापाशी हात जाेडून उभा राहिला.कृष्ण जागा झाला. त्याने प्रथम अर्जुनास पाहिले व नंतर दुर्याेधनास पाहिले.दुर्याेधन म्हणाला- युद्धात मला साह्य मागण्यासाठी मी तुझ्याकडे आलाे आहे. आपली पुरातन पद्धत अशी आहे की जाे काेणी प्रथम साह्य मागणेस येईल त्याला साह्य देणेचा हा नियम सज्जन पाळतात.
 
तू जगात सर्व सज्जनात पहिला आहेस. मी प्रथम तुझ्याकडे आलाे आहे. अर्जुन नंतर आला आहे म्हणून तू या युद्धात मला साह्य दे.’ त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे दुर्याेधनाचे मागणे बिनताेड हाेते. तसं पाह्यलं तर कृष्णापुढे हा माेठा पेचप्रसंग हाेता, असल्या पेचप्रसंगात बाकीचे महान महान लाेक अडकून पडले आहेत, पण कृष्ण तेवढा पेचप्रसंगातून सुटला आहे असे महाभारत सांगते.काेणी द्युताला बाेलावले तर नाही म्हणायचे नाही असा युधिष्ठिराचा नियम हाेता. काैरवांनी जेव्हा त्याला द्युताला बाेलावले व त्या द्युतामुळे महाभारत झाले, त्यावेळचा पेचप्रसंग तेथे जमलेल्या महान महान लाेकांना साेडवता आला नाही.त्यावेळी तेथे कृष्ण नव्हता. शाल्वाबराेबर युद्ध करण्यात ताे गुंतला हाेता.