ओशाे - गीता-दर्शन

    13-Oct-2022
Total Views |
 
 
 

Osho 
इतर जे घाट आहेत त्यांचा तीर्थंकराने इन्कार केलेला नाही. म्हणून महावीरांनी कुठल्याही घाटाचा अव्हेर केलेला नाहीये. त्यांनी म्हटले आहे की इतरही घाट आहेत, त्यांच्या द्वारेही कुणी जाऊ शकताे, असेच त्याने म्हटले आहे. त्यामुळे महावीरांना ार कमी लाेक समजू शकले. कारण महावीरांनी कुणालाच चूक म्हटले नाही. त्यांनी म्हटले ठीक आहे, ताेही एक घाट आहे. हे त्यांनी कुणाला सांगितले आहे? बराेबर - जाे त्यांच्या सांगण्याच्या एकदम उलट बाेलताे त्याला. जाे म्हणताे की मी तुमच्या विराेधात उभा आहे. तुम्ही इकडे घाट बनवला, मी तिकडे बनवला. आपण दाेघे बराेबर कसे असू शकू? त्यालाही महावीर म्हणतात - नाव वल्हवली की आपण एकाच गंगेत पाेहाेचू. तुम्ही जाे तिकडे बराेबर उलट्या बाजूला घाट बनवलात ताे तिकडून उतरणाऱ्यांसाठी नक्कीच उपयाेगी पडेल. इकडच्या घाटावरून उतरणारे त्या घाटावरून कसे उतरू शकतील बरे?
 
अन् तिकडचे लाेक या घाटावरून कसे उतरू शकतील? तेव्हा महावीर एवढेच म्हणतात, घाट काेणताही असू द्या, गंगेत, सत्याच्या गंगेत, अस्तित्वाच्या गंगेत एकदा उतरा म्हणजे झाले. म्हणून तर ते सगळ्यांनाच ठीक म्हणतात. मग महावीर चूक कशाला म्हणतात? जेव्हा काेणी म्हणताे की एक अमुक हाच घाट बराेबर आहे, बाकी सर्व घाट चुकीचे आहेत, असे जे म्हणणे आहे ते चुकीचे आहे. बाकी काहीएक चूक नाही. घाट बराेबर आहेत. फक्त दावा चुकीचा आहे. त्या घाटाने पण जाता येते हे रास्त आहे, पण त्याच घाटाने जाता येते हा दावा चुकीचा आहे. महावीर म्हणतात की फक्त एवढेच म्हणाना - याही घाटाने जाता येते.असे म्हणू नका की या एकाच घाटाने जाता येते.दुसऱ्या घाटाचा इन्कार केला ‘याच घाटाने’ म्हटले की हिंसा आलीच म्हणून समजा.