गीतेच्या गाभाऱ्यात

    13-Oct-2022
Total Views |
 
 
पत्र पंचविसावे
 

Bhagvatgita 
 
तू हे बलरामाचे भाषण नीट समजून घे. गीता भीष्मपर्वात आहे पण त्या पर्वापेक्षा उद्याेगपर्वाला जास्त महत्त्व आहे.‘भारते सारं उद्याेगपर्वम्’ असे म्हटले आहे.अन्यायाने द्यूतात जिंकल्यानंतर पांडवांनी जर एकदम उठाव केला असता, तर किती तरी राजे लाेक त्यांच्या बाजूने उभे राहिले असते पण तेरा वर्षाच्या काळानंतर परिस्थिती पालटली हाेती. सत्तेच्या जाेरावर दुर्याेधनाने आपली बाजू बळकट केली हाेती. तेरा वर्षापूर्वी पांडवांच्यावर जाे अन्याय झाला हाेता त्यामुळे लाेक संतप्त हाेते पण आता अन्यायाची जाणीव पुसट झाली हाेती.अग एवढा माेठा बलराम पण त्याच्या वृत्तीमध्ये केवढे अंतर पडले पहा. पांडवांच्यावर अन्याय हाेऊन ते वनवासात गेल्यावर वनपर्वात बलराम जे भाषण करताे ते ह्या दृष्टीने पाहण्यासारखे आहे.ताे म्हणताे- ‘‘दुर्याेधनाचे पाप एवढे माेठे आहे की पृथ्वी त्याला गिळून का टाकत नाही व जगू कशी देते हेच मला समजत नाही. त्या पापामुळे पृथ्वी विदीर्ण का हाेत नाही?’’ वनपर्वात असे बाेलणारा बलराम तेरा वर्षांनंतर उद्याेगपर्वात वरीलप्रमाणे बाेलला.
 
अग, तेरा वर्षांच्या काळामध्ये दुष्ट दुर्याेधनाने केवढी क्रांती केली हाेती, ते त्या भाषणावरून तुला कळून येईल.तू असे लक्षांत घे कीज्याच्या हातात राज्य-सत्ता असते ताे स्वार्थी अन्यायी असला तरी ताे आपल्या कृत्यावर न्यायाचा मुलामा चढवू शकताे व लाेक देखील त्याचे गुणगान करू लागतात. जग हे असेच आहे.बलरामाचे भाषण उद्याेगपर्वाच्या दुसऱ्या अध्यायात आले आहे. त्या भाषणामुळे सात्यकी संतापला. त्याचे भाषण तिसऱ्या अध्यायांत आहे. ताे म्हणताे.- ‘‘बलरामा, जसे तुझे अंतरंग तसे तुझे बाेल. धर्मराजाला थाेडासुद्धा दाेष देणाऱ्याना त्या सभेत बाेलू कसे दिले जाते? काैरव दुष्ट आहेत. खरं पाहिलं तर सर्वच राज्य पंडूचे म्हणून पांडवांचे; काैरवांचा त्यावर ह्नकच नाही. पांडवांनी अज्ञातवास पुरा केला आहे. आता त्याना नमून बाेलण्याचे काहीच कारण नाही आता धर्मराजाला राज्य तरी मिळाले पाहिजे नाही तर युद्ध हाेऊन प्रतिपक्षीयांनी युद्धभूमीवर शयन तरी केले पाहिजे’’ *** त्या भाषणावरून तुला कळून येईल कीकृष्णाचेच तेवढे भाषण समताेल व न्यायाला धरून हाेते.