राजा हसला आणि म्हणाला तुम्ही एवढे विद्वान आणि तुम्हाला कळत नाही का की मरताना माणसाला सुईसुद्धा बराेबर नेता येत नाही. हे उत्तर देतादेताच राजाला सत्याचा साक्षात्कार झाला की, हे दृश्य जग नाशवंत आहे. त्याने सद्गुरूचे पाय धरले आणि त्याला विरक्ती आली.या समासात श्रीसमर्थ विरक्ताने कसे असावे ते सांगताना म्हणतात की, त्याने विवेकाने वागून अध्यात्म वाढवावे आणि धैर्याने षड्रिपुंवर विजय मिळवावा. अध्यात्म साधना, भजन, भक्ती याद्वारे आपले ब्रह्मज्ञान प्रगट करावे. मन निभ्रांत आणि शांत करून प्रयत्नपूर्वक वैराग्य स्थिर करावे. त्याने सत्कृत्ये करीत राहावे.ऐहिक गाेष्टीबद्दल सदा उदासीन राहावे आणि हे वैराग्य दृढतेने सांभाळावे. विकार हे परमार्थ मार्गातील शत्रू केव्हा डाेके वर काढतील याचा पत्ता लागत नाही म्हणून श्रीसमर्थ म्हणतात की, सुदृढपणे म्हणजे घट्टपणे आणि पूर्ण विश्वास व सामर्थ्याने, विवेकाने वैराग्याचे जतन करावे! -प्रा.अरुण गाेडबाेले, माे. 9822016299