गाईच्या शेणाच्या उपयाेगाचे क्षेत्र अधिकाधिक वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. तीन वर्षांपूर्वी शेणाच्या आधारे गणेशाेत्सवातील गणपतीची मूर्ती तयार करण्यास आरंभ झाला आणि आता दिवाळीतील पणत्या, राखी पाैर्णिमेच्या राख्या, हाेळीमधील गाेवऱ्याही हाेऊ लागल्या. (भाग : 1496)
गेल्या वर्षात शेणाच्या आधारे घरातील भिंतींचे रंग तयार करण्यास आरंभ झाला आणि ताे रंग अनेक अर्थांनी पारंपरिक रंगांपेक्षा अधिक चांगला असल्याचे लक्षात आले. अर्थात, त्याला खादी ग्रामाेद्याेग खाते ज्यांच्याकडे हाेते ते नितीन गडकरी यांचे परिश्रम महत्त्वाचे ठरले. प्लॅस्टिकच्या रंगांपेक्षाही हे रंग सुबक वाटू लागले. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्यामुळे घरातील पर्यावरण सुधारते.
उन्हाळ्यात घरी थंडपणा असणे आणि थंडीच्या काळात घरात उब असणे ही अतिशय महत्त्वाची बाब त्यामुळे साध्य झाली. फक्त रंगानेच त्या बदलाला आरंभ झाला. गेली पंचवीस वर्षे या शेणाच्या साह्याने घराच्या विटा आणि भिंतीचे प्लॅस्टर यांची निर्मिती करणारे हरियानातील डाॅ. शिवदर्शन मलिक यांचे प्रयाेग अनेक ठिकाणी मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांच्या या प्रयाेगामुळे बांधकाम खर्च निम्म्यापेक्षा कमी येताे. अनेक मजली बांधकामात सिमेंटचा आरसीसी सांगाडा आणि शेणाच्या विटा आणि प्लॅस्टर हाही एक चांगला पर्याय उपलब्ध झाला. उत्तर भारतात थंडीही अधिक असते आणि उन्हाळाही तीव्र असताे.
या विटांच्या घरात उन्हाळ्यात शीतलता आणि थंडीत ऊबदारपणा असा ायदा मिळताे. अशा विटांची निर्मिती आणि बांधकाम यांचे ते वर्गही घेतात.गुगलवर वेदिक प्लॅटिक सर्च दिला की सारी माहिती मिळते. आता अनेक परदेशी लाेकांनीही याचे प्रयाेग सुरू केले आहेत. असे असले तरी हे तंत्रज्ञान अजून विकसनशील अवस्थेत आहे. या खेरीज दहा किलाे शेणात एक एकर शेती आणि जीवामृताच्या आधारे साऱ्या शहरातील सर्व प्रकारच्या घाणीची स्वच्छता हे विषय यापूर्वी वारंवार लिहून झाले आहेत.यातील लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे आपल्या धर्मात गाईला गाेमाता मानल्यामुळे काेणत्याही परिस्थितीत गाईचे संरक्षण झाले पाहिजे. केवळ अशाच दृष्टिकाेनातून याकडे पाहिले गेल्याने गाेविज्ञानातील प्रचंड सामर्थ्याकडे दुर्लक्ष झाले. वस्तुस्थिती अशी आहे की, दिवाळीत घरात लावलेली शेणापासून तयार केलेली पणतीही घरात शांत वातावरण निर्माण करते, हे लक्षात आले, तर गाेजीवनाचे आपल्या आयुष्यात किती प्रचंड उपयाेग आहेत, त्याकडे लक्ष वळते.