गाेहत्येवर बंदी घालणारे आज जे संदर्भ मिळत आहेत, त्यातून गाईबाबतची अनेक वैशिष्ट्ये पुढे येत आहेत. (भाग : 1495)
त्यात प्रामुख्याने मुघल राजवट आणि त्याच्या आधीच्या अफगाणी पक्तुनी आणि इराणी राजवटीचा समावेश हाेताे.दहशती कारवायांबाबत आज जी स्थिती अिफगाणिस्थानमध्ये आहे तशीच स्थिती गझनीचा महंमद भारतात आला तेव्हा हाेती. गझनीच्या महंमदाच्या अठरा स्वाऱ्या झाल्या आणि प्रत्येक स्वारीत त्याची भूमिका तालिबानी टाेळ्याचीच हाेती. तरीही काही ठिकाणी कुराणचा उल्लेख करून गाईची हत्या करू नका, अशी त्याची विधाने आहेत.बाबर या माेगल सम्राटाबाबतही हीच स्थिती आहे. बाबराच्या आधीही येथे मुसलमान सम्राटच हाेते आणि तेही दहशतवादी अत्याचारीही हाेते, पण त्यांना पराभूत करून येथील सम्राट हाेणे हे बाबराला शक्य झाले. कारण ताे अधिक दहशतवादी हाेता, पण बाबराचे गाेहत्येसंदर्भात काय म्हणणे आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे.
आपला मुलगा हुमायून याला लिहिलेल्या पत्रात असे विधान आहे की, तुला जर भारतीयांची मने जिंकायची असतील, तर ताे काेठेही गाेहत्या हाेऊ देऊ नकाेस.नंतरच्या अठराव्या शतकातीलही एक संदर्भ मिळताे. अठरावे शतक हे दिल्लीवर मराठ्यांचे वर्चस्व असल्याचे शतक मानले जाते.दिल्लीचे बादशहा हे नामधारी असायचे व त्यांची सारी सूत्रे दीर्घकाळ महादजी शिंदे यांच्याकडे हाेती. त्या काळी महादजी शिंदे यांनी दिल्लीच्या बादशहाला भारतातील त्यांच्या नियंत्रणाच्या क्षेत्रात गाेहत्याबंदी करावी, असा सल्ला दिला हाेता आणि बादशहाने ताे मान्यही केला हाेता. त्यामुळे गाेहत्याबंदी हाेती. याचा संदर्भ मुसलमानी रियासतीत मिळताे आणि ज्येष्ठ संशाेधक श्री. ग. ह. खरे यांच्या मराठ्यांचा इतिहास या पुस्तकातही मिळताे.येणाऱ्या काळात जगातील काही देशांत दहशतवादाचे राज्य असण्याची शक्यता दिसत आहे. त्यापासून सावध राहणे ही फक्त सरकारची जबाबदारी असू शकत नाही. प्रत्येकाने तयारी करायला हवी. त्याचसंदर्भात अन्य घटनांचाही अभ्यास करायला हवा.