प्रत्येक व्यक्ती गाेजीवनाशी संबंधित करण्याचा प्रयत्न

    04-Sep-2021   
Total Views |
 
 
मध्य प्रदेशचे एक कॅबिनेट मंत्री श्री. हरदीपसिंग डंग यांनी त्यांच्या राज्यात गाेवंश संस्कृत विकसित हाेण्याच्या दृष्टीने काही विधाने केली आहेत. नेहमीच्या राजकीय नेत्यांच्या विधानांच्या तुलनेत ती अचंबित करणारे आहे. 
(भाग : 1493)
 
 
 
cow_1  H x W: 0
 
त्यांचे पहिले विधान असे आहे की, राजकारणात उतरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने घरी गाय पाळली पाहिजे. काेणालाही निवडणूक लढविताना गाय पाळणे ही महत्त्वाची अट असणे आवश्यक आहे.त्याची पडताळणी निवडणूक आयाेगाने करणे आवश्यक आहे. त्यांचे दुसरे विधान असे आहे की, प्रत्येक शेतकऱ्याने गाेवंश तर पाळलाच पाहिजे, पण तशी त्याच्या सातबाराच्या उताऱ्यावर नाेंद असावी. शेतकऱ्याच्या शेतासंदर्भात काेणताही शासकीय व्यवहार करताना त्याच्याकडे गाय आहे की नाही, हे तपासून बघितले पाहिजे.त्या मंत्रिमहाेदयांचे अजून एक विधान असे की, राज्य सरकारच्या ज्या कर्मचाऱ्यांना पंचवीस हजारांपेक्षा अधिक पगार आहे, त्यांनी दरमहा पाचशे रुपये गाेपालन सेवाकर द्यावा. मंत्रिमहाेदय गाेवंश विकासासंदर्भातील एका कार्यक्रमात बाेलत हाेते. आशाग्राम डाेंगरावर वीस हजार राेपे लावण्याचा कार्यक्रम झाला, त्या वेळच्या भाषणात त्यांनी हे विधान केले.
 
नंतर त्यांना पत्रकारांनी विचारले की, हा विषय तुम्ही राज्याच्या कॅबिनेटसमाेर मांडला आहे का, त्यावर त्यांचे म्हणणे असे की, यावर सर्वांच्या मनाची तयारी हाेण्यास वेळ लागेल, पण हे मत लाेकप्रतिनिधींनाही पटू लागले आहे. हरदीपसिंग यांच्याबराेबर तेथील नगरविकास मंत्री भूपेंद्रसिंग यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिला. त्या विधानावर काँग्रेस आमदार आरिफ मसूद यांनी असे विधान केले की, वास्तविक गाय पाळणे हे माझ्याही मनात आहे.माझा धर्म लक्षात घेता माझ्याकडे गाय असल्यास माझ्यावर हल्ला हाेण्याची शक्यता आहे. मला संरक्षण मिळाले तर मी गाय जरूर पाळीन.सध्याची देशातील राजकीय परिस्थिती बघता आत्ताशी काेठे गाेविज्ञानाविषयी लाेकप्रतिनिधींमध्ये आणि जाणकारांमध्ये जाण निर्माण हाेते आहे. त्यामुळे त्यावर लगेच सर्वांचा हाेकार मिळणे कठीण आहे, पण मध्य प्रदेशात जैविक शेती किंवा सद्रिय शेती किंवा गाेधारित शेतीचे प्रमाण देशात क्रमांक एकचे आहे. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांत त्या राज्यातील रासायनिक खतांच्या वापराचे प्रमाण कमी झाले आहे.