देशातील आयात कमी करणे अतिशय महत्त्वाचे

    03-Sep-2021   
Total Views |
 
 
या देशातील ब्रिटिशांची सत्ता गेल्यावर येथील राज्यकर्त्यांनीच इंग्रजांना हवी असलेली धाेरणे स्वीकारली. एवढेच नव्हे, तर माेगलांच्या काळातीलही धाेरणे स्वीकारली. (भाग : 1492)
 
 

cow_1  H x W: 0 
 
सध्या साेशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा एक संदेश फिरताेय. त्या संदेशाचा स्राेत त्यात नाही, पण त्यातील विधाने पंतप्रधानांनी निरनिराळ्या संदर्भात अनेक वेळा केल्याने या संदेशाचीही दखल घ्यावी लागत आहे.त्याचा सारांश असा आहे की, तीनशे वर्षांपूर्वी भारतात इंग्रज हे व्यापाराच्या निमित्ताने आले आणि येथील विस्कळित परिस्थितीचा फायदा घेऊन ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. त्यातून देशाच्या राजकारणाचा ताबा तर घेतलाच, पण दीडशे ताे दाेनशे वर्षे सर्व प्रकारची लूट सुरू ठेवली.
जागतिक व्यापार कराराने सध्या सगळ्याच देशांची दारे व्यापारासाठी एकमेकांसाठी उघडी आहेत. तशी चीनलाही आहेत. याचकाळात भारतीय वस्तूंच्या तुलनेत कमी किमतीत चीन हजाराे ग्राहकाेपयाेगी वस्तूंची भारतात निर्यात करत आहेत, पण आपल्याला जाे इंग्रजांचा अनुभव माहीत आहे, ताेच जरी लक्षात घेतला तरी आपण चीनचा माल किंवा काेणत्याही परदेशी उत्पादनाचा माल विकत घेणे याेग्य ठरणार नाही. येथे प्रत्येक बाबीला पर्याय आहे, पण त्यासाठी थाेडे कष्ट घेण्याची तयारी हवी. युराेपियनांनी आपल्यावर गेल्या शंभर वर्षांत रासायनिक खते आणि संकरीत गाई लादल्या.
 
त्यातून आपली पारंपरिक शेती नाहीशी झाली. चीनचे डाव आपल्याला कळायलाही काही वर्षे लागतील, पण त्यावर आजच बहिष्कार घातला तर पुढील तीनशे वर्षांची संकटे आपण आत्ताच राेखू शकू.. जेथे शक्य आहे तेथे सर्व शक्तिनिशी बहिष्कार घातल्यास अवघ्या तीन महिन्यांत डाॅलर-रुपया हे प्रमाण जे सत्तर रुपये आहे ते दाेन रुपयावर येईल.या देशातील ब्रिटिशांची सत्ता गेल्यावर येथील राज्यकर्त्यांनीच इंग्रजांना हवी असलेली धाेरणे स्वीकारली. एवढेच नव्हे, तर माेगलांच्या काळातीलही धाेरणे स्वीकारली. त्याची प्रचिती आज आपल्या पाठ्यपुस्तकांतून येत आहे. ब्रिटिशांच्या काळात येथे जनतेने रासायनिक खते स्वीकारली नाहीत. पारंपरिक गाेआधारित शेती केली, पण नंतर येथे रासायनिक खते आली व बहुतेक जमीन नापीक आणि खारपड हाेऊन बसली. आता देश शिक्षणाने बराच पुढे गेला आहे.त्यामुळे याबाबी प्रत्यक्ष आचरणात येणे आवश्यक आहे.