गेल्या सहा सात वर्षांत या साऱ्याला पुन्हा माेठी गती मिळती आहे. त्याचा भारतापुरता विचार केल्यास फक्त भारतातच गाेआधारित शेती आणि वैद्यक यांची प्रगती हाेत आहे.
-(भाग :1516)
वास्तविक हे विषय सुरू झाल्यावर तेवढेच परिणामकारक असे नागरी स्वच्छता, बांधकाम, पर्यावरणशुद्धी अशी जवळजवळ दहा क्षेत्रे विकसित हाेत आहेत. याचा अनुनय प्रामुख्याने आफ्रिकेत झाला तर गेल्या पाचशे वर्षात युराेपीयांनी त्या समृद्ध देशांचे भिकेकंगाल देशात रूपांतरण केले आहे. ती स्थिती त्यांनी भारताची आणि अन्य आशियायी देशांचीही करायची हाेती. आजही जेथे रासायनिक खतांचा वापर माेठ्या प्रमाणात सुरू आहे, पण गाेआधारित शेतीच्या आधारे प्रत्येक शेतीक्षेत्र अतिशय कमी खर्चात सुजलाम सुफलाम हाेऊ शकते.पण जगाची गाेतस्करी आणि गाेमांस यांची चव अजून गेलेली नाही.
जगात गाेवंश तस्करीच्या क्षेत्रात ज्या बाबी घडत आहेत, त्या साऱ्या भारतातही घडत आहेत. त्यामुळे त्याला उत्तर देण्याच्या दृष्टीने भारतात जे गाेविज्ञानाचे प्रयाेग सुरू आहे, त्याला जसे स्थानिक महत्त्व आहे तसे जगाच्या दृष्टीनेही महत्व आहे.अगदी पंधरावीस वर्षापूर्वीपर्यत भारतात अल कबीर कत्तलखाना हा राष्ट्रीय गाेवंश धाेरणाचा मध्यबिंदू हाेता.पण गेल्या सहा, सात वर्षांत गाेविज्ञानाचा लाेकविज्ञानासाठी उपयाेग करण्याचे प्रयाेग झाले. त्यांचे प्रयाेग हे येणाऱ्या काळातील गाेविज्ञान-संहिता आहेत. त्या विषयाला चालना देणारी सरकारे केंद्रात आणि अनेक राज्यात आल्याने त्यादृष्टीने अनेक घटना घडत आहेत, पण तस्करी आणि अन्य बेकायदा व्यवहार हेही सुरू आहेत.
एका गाईच्या शेणापासून आणि गाेमूत्रापासून पंचवीस ते तीस एकर बागाईतही शेतीही हाेते ही गेल्या दहा वर्षात पुढे आलेली बाब आहे. कदाचित येणाऱ्या काळात हा जागतिक महत्वाचा कार्यक्रम ठरणार आहे.विदेशी गाेवंश किंवा संकरीत गाेवंश यांच्यापासून हा फायदा नाही.विदेशी गाेवंशावर भारतातही भारतीय गाेवंशाप्रमाणेच काही प्रयाेग केले गेले पण अपेक्षित परिणाम मिळाला नाही.
उलट हिस्टॅडिन नावचा मानवी शरीराला अपायकारक घटक मिळाला. कदाचित अजून काही प्रयाेग केल्यावर कांही चांगलेही निघेल.